Investigation into Onion Purchase Process: केंद्र सरकारच्या ‘किंमत स्थिरीकरण निधी’ योजनेअंतर्गत नाशिकमध्ये झालेल्या रब्बी-२०२४ च्या कांदा खरेदीबाबत ‘नाफेड’ने दोन वर्षांनंतर चौकशीचा बडगा उगारला आहे. या खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकता तपासण्यासाठी ‘नाफेड’ने विशेष चौकशी पथक नियुक्त केले आहे..या पथकात पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते नाशिकला भेट देऊन येथे झालेल्या एकूण कांदा खरेदीच्या ५ टक्के व्यवहारांची पडताळणी करणार आहे. ‘नाफेड’च्या नाशिक शाखेने रब्बी-२०२४ मध्ये कांदा खरेदी केली होती. त्या अनुषंगाने या प्रक्रियेत शेतकऱ्यांना देयके प्रत्यक्ष मिळाली का, खरेदी प्रक्रियेत काही त्रुटी आहेत का, याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत..Onion Procurement Scam: कांदा खरेदीमध्येही भोंदू खरातचा महाघोटाळा.या चौकशीत सुमारे ३५० शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या देयकांचा आणि नोंदींचा समावेश असेल. या विशेष चौकशीसाठी ‘नाफेड’च्या मुख्यालयाने इंदूर, बंगळुरू, पाटणा आणि दिल्ली मुख्यालयातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे पथक सुमारे एक आठवडा नाशिकमध्ये तळ ठोकून असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली..Onion Procurement Issues: उद्दिष्टात घट, गोंधळात वाढ.चौकशी पथक केवळ कागदपत्रांचीच नव्हे, तर लाभार्थी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुभव पत्रे मिळवून खरेदीच्या सत्यतेची पडताळणी करणार आहे. चौकशीदरम्यान अहवालातून अनियमितता अथवा गैरव्यवहार समोर आल्यास कारवाईचा पर्याय अवलंबला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले..तक्रारींनंतर ‘नाफेड’चे पाऊल२०२४ मधील खरेदी व वितरण प्रक्रियेसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारी आणि कांदा खरेदी गैरव्यवहाराबाबत उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिका यांच्या पार्श्वभूमीवर ‘नाफेड’ने चौकशीचे पाऊल उचलले आहे. अनेक तक्रारींत कांदा विक्री करणारा शेतकरी वेगळा, त्याचे देयक मिळालेला शेतकरी भलताच, असा प्रकार समोर आला होता. चौकशी पथक या अनुषंगानेही तपास करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.