Onion Purchase Controversy: गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘नाफेड’चा कांदा खरेदी व साठवणूक कारभार पुन्हा एकदा संशयाच्या घेऱ्यात आला आहे. ‘पुन्हा पाढे पंचावन्न’ अशी स्थिती असलेल्या या प्रक्रियेत, मागील गैरव्यवहारांमुळे निलंबित झालेल्या वादग्रस्त शाखा व्यवस्थापकास पुन्हा दिल्ली कार्यालयात सेवेत घेण्यात आले आहे. तर गोवा राज्यात कांदा पुरवठ्यात गुन्ह्यामध्ये नोंद असलेल्या काही खरेदीदारांना पुन्हा झुकते माप दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे..२०२४ मध्ये कांदा खरेदीतील गैरव्यवहार चर्चेत आल्यानंतर नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी नाशिकचा दौरा करून भ्रष्टाचार उघड केला होता. या प्रकरणी दीड वर्षांपूर्वी तत्कालीन शाखा व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले होते. त्यांची दिल्ली मुख्यालायात झालेल्या ‘पुनर्वसना’मागे नेमका कुणाचा वरदहस्त आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे..NAFED NCCF Onion Procurement: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीत वखार महामंडळाची ‘एन्ट्री’ .गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांना ‘रेड कार्पेट’गोवा फेडरेशनच्या कांदा पुरवठा व अपहार प्रकरणात ज्या संस्थांवर मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. त्या संस्था केंद्रीय वखार महामंडळाच्या माध्यमातून साठवणुकीचे कंत्राट मिळविण्यासाठी हालचाली करत आहेत. म्हणजेच यापूर्वी ‘नाफेड’कडून थेट काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्यांच्या या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही नावे साठवणूक काम मिळविण्यासाठी मोठ्या ‘अर्थ’पूर्ण हालचाली झाल्याचे सूत्रांनी सांगितले..NAFED Onion Procurement: अवसायनातील संस्थेकडून ‘नाफेड’ची कांदा खरेदी.वारंवार बदल्यांमुळे गोंधळ चर्चेत२०२४ मध्ये ‘नाफेड’ने तत्कालीन शाखा व्यवस्थापक निखिल पाडदे यांच्याकडून जबाबदारी काढून घेतल्यानंतर पुढे सरव्यवस्थापक असलेले शंकर श्रीवास्तव यांच्याकडे जबाबदारी आली. त्यानंतर आर. एन. पटनाईक यांच्याकडे जबाबदारी आली. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. आता त्यांची उचलबांगडी होऊन अंकित मदान यांच्यावर जबाबदारी शाखा व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या शाखा व्यवस्थापकांच्या बदल्यांमुळे अधिकच गोंधळ वाढला आहे..केंद्र सरकार कांद्याच्या पारदर्शक खरेदीसाठी योग्य ते उपाययोजना करू शकत नाही. हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे दुर्दैव आहे. ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीत दर वर्षी कोट्यवधींचा गैरव्यवहार होत असूनही अद्यापपर्यंत सरकारला पारदर्शक पद्धतीने कांदा खरेदी राबविणारे अधिकारी नियुक्त करता आले नाही, ही मोठी शोकांतिका आहे.-भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.