Farmer Complaint: केंद्र सरकारच्या ‘किंमत स्थिरीकरण निधी’ योजनेअंतर्गत ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’मार्फत झालेल्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार, निकृष्ट दर्जाच्या कांद्याची खरेदी आणि शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे..भगरे यांनी पत्रात म्हटले आहे की, यापूर्वी शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत झालेल्या कांदा खरेदीत भ्रष्टाचाराच्या तक्रारी होऊनही दोषींवर ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे यंदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत खरेदी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, १५ मेपासून सुरू झालेल्या खरेदीत केंद्रीय वखार महामंडळाने केवळ ‘ग्रेड-ए’ कांद्याची अट घातल्याने दोन महिन्यांत केवळ ३४ हजार टन (१७ टक्के) कांद्याची खरेदी झाली. .Onion Procurement: शासकीय कांदा खरेदीवरील संशयाचे धुके गडद.त्यानंतर सरकारने अचानक ‘यूआरएस’ श्रेणी लागू केली. या निर्णयानंतर डागी, आकार बिघडलेला आणि निकृष्ट दर्जाचा कांदाही ‘ग्रेड-ए’च्या दराने खरेदी करण्यात आल्याचा आरोप भगरे यांनी केला आहे. त्यामुळे दर्जेदार कांदा उत्पादकांवर अन्याय झाला असून कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराला खतपाणी घातल्याचा दावा त्यांनी केला..Onion Procurement Issue: ‘ए’ ग्रेडच्या नावाखाली कांदा खरेदीत पिळवणूक.शाखा व्यवस्थापकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन महिने संथ असलेली खरेदी अवघ्या सहा दिवसांत ५० हजार टनांपर्यंत पोहोचली. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. या खरेदीत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तसेच ग्राहकांनाही कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली..भगरे यांच्या प्रमुख मागण्या‘नाफेड’-‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी.दोषींवर कठोर कारवाई करावी.कांद्यासाठी ‘प्राईस डिफरन्स’ भरपाई योजना लागू करावी.बाजारभाव घसरल्यास शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे.कांदा निर्यात धोरण स्थिर ठेवावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.