Chana Farmers: यंदा राळेगाव शहरासह तालुक्यात हरभरा पिकाचे समाधानकारक उत्पादन झाले असले, तरी ‘नाफेड’कडून मर्यादित खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. बाजारभाव कमी असल्याने शेतकरी ‘नाफेड’वर अवलंबून असताना खरेदीची मर्यादा अपुरी पडत असल्याची तक्रार आहे..राळेगाव तालुक्यात सरासरी एकरी सुमारे १० क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन झाले आहे. मात्र ‘नाफेड’च्या नियमानुसार हेक्टरी १४.७८ क्विंटल म्हणजेच एकरी सुमारे ५.९० क्विंटलच खरेदी केली जात आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे सरासरी ३ ते ४ क्विंटल हरभरा शिल्लक राहत आहे. . Farmer Demand: ‘नियमित कर्ज भरणारा शेतकरी कायम अन्यायाच्या छायेत’.‘नाफेड’चा हमीभाव ५८७५ रुपये प्रति क्विंटल असताना खुल्या बाजारात हरभऱ्याला केवळ ५००० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने प्रति क्विंटल ५०० ते ७०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, २०२४-२५ हंगामातील पीक कापणी प्रयोगांच्या आधारे जिल्हानिहाय खरेदी मर्यादा निश्चित केली जाते. यवतमाळ जिल्ह्यासाठी ही मर्यादा १४.७८ क्विंटल प्रति हेक्टर ठरविण्यात आली असताना, लगतच्या वर्धा जिल्ह्यासाठी हीच मर्यादा १७ क्विंटल प्रति हेक्टर आहे..Farmer Demand: वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा.यंदा हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले आहे. मात्र नाफेडची खरेदी मर्यादा अपुरी आहे. ही मर्यादा वाढविण्यासाठी शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडे पाठपुरावा करणार आहे.- अॅड. प्रफुल्ल चौहान, जिल्हाध्यक्ष, भाजप.माझ्या शेतात एकरी १० क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन झाले. मात्र ‘नाफेड’ फक्त ६ क्विंटलच खरेदी करत आहे. उरलेला हरभरा कमी भावात बाजारात विकावा लागत असून आर्थिक नुकसान होत आहे.- अभय फाळके, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.