Mumbai News : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्यासोबत कविवर्य ना. धों. महानोर यांची शेती आणि साहित्यावरील चर्चा ऐकणे म्हणजे मेजवानी असायची. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार असणे म्हणजे जणू दुग्धशर्करा योग जळून येत होता. .शेतकऱ्यांचे जीवन उत्तम कसे होईल आणि त्यांच्या चेहऱ्यावर कसे हास्य फुलेल यासाठी ना. धों. महानोर काम करत राहिले. ते अष्टपैलू होते. कविता, साहित्य, चित्रपटगीते लिहिताना त्यांनी शेती आणि पाण्यासाठी मोलाचे कार्य केले, असे गौरवोद्गोगार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनी काढले..Na. Dho. Mahanor : रानकविता पोरकी झाली! .यशवंतराव चव्हाण सेंटर व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शुक्रवारी (दि. २६) ते बोलत होते..या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, उद्योजक अशोक जैन, खासदार सुप्रिया सुळे, ना. धों. महानोर यांच्या कन्या सरला महानोर-शिंदे यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले..Na. Dho. Mahanor : रानकवी ना. धों. महानोर यांचा जीवनपट....या वेळी महाराष्ट्राच्या सहा विभागांतून गीतकार अविनाश पोईनकर (चंद्रपूर), मुक्त पत्रकार हिना कौसर खान (पुणे), कवी-गीतकार वैभव देशमुख (बुलडाणा), सुचिता खल्लाळ (नांदेड) यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार तर पालघरमधील साधना उमेश वर्तक आणि नंदुरबारमधील कुसूम सुनील राहसे यांना कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते..अरुणभाई गुजराथी म्हणाले, की ना. धों. महानोर हे महान आणि महाकवी होते; त्यांनी कवितेच्या माध्यमातून समाजाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रत्येकाशी असलेली मैत्री ही निखळ आणि निरागस होती.खासदार सुळे म्हणाल्या, की महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे कार्यक्रम करायचा की नाही या द्विधा मन:स्थितीत आम्ही होतो. आज ना. धों. महानोर असते तर त्यांनी महाराष्ट्राची वेदना कशा प्रकारे शब्दबद्ध केली असती, हे सांगणे कठीण आहे. .आजचे नवकवी त्यांचा वारसा पुढे सुरू ठेवतील, अशी आशा व्यक्त केली. महानोरांच्या कन्या सरला महानोर-शिंदे यांनी वडिलांच्या आठवणी जागवल्या. दत्ता बाळसराफ यांनी ना. धों. महानोर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या ऋणानुबंधांची आठवण सांगत कार्यक्रमाचे संचालन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.