Dharashiv News : राजंणी (ता. कळंब) येथील नॅचरल उद्योग समूहाच्या एन. साई मल्टी स्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटीला यावर्षी ७ कोटी ३९ लाख ६४ हजार रुपये नफा झाला असून बँकेच्या सभासदांना अठरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष कृषी रत्न बी.बी.ठोंबरे यांनी दिली..एन. साई मल्टी स्टेट कोऑपरेटीव्ह सोसायटीची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १२) साई मंगल कार्यालयात घेण्यात आली. अहवाल वाचन करतांना अध्यक्ष ठोंबरे यांनी माहिती दिली. .State Cooperative Bank: राज्य सहकारी बँकेचे सोसायट्यांना पाठबळ.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष किशोर डाळे, संचालक नागनाथ कनामे, नॅचरल उद्योग समुहाचे तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे, पांडुरंग आवाड, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पंडितराव टेकाळे, बालासाहेब टेळे, सौ. आशालता रेड्डी, बाबूराव जाधव लेखापरिक्षक विजयकुमार भंडारी, सरव्यवस्थापक उमेश गायकवाड, प्राचार्य जगदीश गवळी उपस्थित होते. .अध्यक्ष ठोंबरे म्हणाले, की बँकेच्या सोळा शाखेत २५० कोटी ५५ लाख ७२ हजार रुपयांच्या ठेवी असून ११२ कोटी ०७ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेच्या १४ हजार १४८ सभासदांचे ४ कोटी ५९ लाख ८६ हजार रुपये भाग भांडवल आहे. .Cooperative Bank: कोल्हापूर जिल्हा बँकेकडून शेतकरी, व्यावसायिकांसाठी विविध योजना; शैक्षणिक कर्जाचा व्याजदर १२ वरून ८ टक्क्यांवर.तर बँकेची वसुली ९७.७५ टक्के आहे.या वेळी साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन रांजणीच्या बीसीएस मध्ये वैष्णवी भारत घटमल (प्रथम शिराढोण), आकांक्षा अंगद साळूंके (द्वितीय घारगाव), साक्षी बन्सी आदमाने (तृतीय रांजणी) आणि बीसीएमधे कांदबरी रामभाऊ ढवारे (प्रथम रांजणी), साक्षी बुबासाहेब देशमुख (द्वितीय कोपरा), प्रतिभा शिवाजी नांगरे (तृतीय जायफळ) या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि दुर्धर आजाराच्या रुग्णांना मदतीचा धनादेश देण्यात आला.या वेळी बँकेचे सभासद तसेच शाखाप्रमुख उपस्थित होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.