PMFBY Compensation Issues: मूर्तिजापूर तालुक्यातील पीकविमा मंजुरीतील तफावतीवरून सुरू झालेला शेतकऱ्यांचा संताप आता थेट कृषिमंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचला आहे. तालुक्यातील आठ महसूल मंडळांपैकी केवळ लाखपुरी आणि कुरूम या दोन मंडळांतील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी प्रति एकर ३०० रुपयांचा तोकडा पीकविमा मंजूर करण्यात आला, तर उर्वरित सहा महसूल मंडळांना वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे..या विरोधात तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार १५ मे २०२६ रोजी तब्बल ४५ अंश तापमानात हजारो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर महामोर्चा काढून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला..Crop Insurance: पीक विम्यासाठी प्रत्येकी दोन हजारांची कपात.आंदोलन मागे घेण्यासाठी पालकमंत्री आकाश पुंडकर यांनी शेतकरी नेते राजू वानखडे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली होती. तसेच हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते..दरम्यान, आमदार हरीश पिंपळे यांनीही महामोर्चाला संबोधित करत लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र २१ दिवस उलटल्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी संघटनांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला आहे..PM Crop Insurance Scheme: ट्रिगर काढल्यामुळे पीकविमा भरपाई तुटपुंजी.त्याअनुषंगाने शुक्रवारी (ता. ५) अकोला येथील नियोजन भवनात झालेल्या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी आणि आमदारांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. त्यानंतर हा विषय प्रथम कृषिमंत्र्यांच्या दालनात आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर नेण्याबाबत चर्चा झाली..या बैठकीस आमदार हरीश पिंपळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, प्रगती शेतकरी मंडळाचे राजू वानखडे, क्रांतिकारी संघटनेचे राहुल वानखडे, युवा सेनेचे अभी पोळकट, स्वाभिमानी संघटनेचे कैलास साबळे तसेच विक्की तिवारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.