Farmers Challenges: राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी मदतीच्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी त्रासले आहेत. कर्जमाफीसह पीकविमा आणि दुष्काळी मदत तातडीने द्यावी, या मागण्यांसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील ४० गावांतील शेतकरी ७ डिसेंबरला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील प्रांगणात उपोषण करणार आहेत. .हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनांनी दिली. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा, २०२५ या वर्षासाठी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली हेक्टरी १७ हजार ५०० रुपयांची पीकविमा मदत द्यावी, तसेच निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीची विमा कंपनीकडून भरपाई मिळावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत..SKM Farmer Protest : संयुक्त किसान मोर्चाचे २६ नोव्हेंबरला देशव्यापी निदर्शने; राष्ट्रपतींना निवेदन पाठवणार.याशिवाय, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मागणीनुसार एक लाख रुपयांपर्यंत मदत द्यावी, चालू कर्जदार शेतकऱ्यांना घोषित केलेली ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत द्यावी आणि चालू वर्षाचा पीकविमा मंजूर करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे..दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची कॉन्व्हेंटपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची संपूर्ण शैक्षणिक फी शासनाने भरावी, पुनर्गठन केलेल्या; मात्र कर्जमाफीच्या लाभातून वगळलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. २०२७ मध्ये पुनर्गठित होणारे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतजमिनीच्या कुंपणासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज मिळावे, यासाठी नाबार्डने धोरण आखावे आणि बँकांना कर्जपुरवठ्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे..Sugarcane Farmer Protest: ऊसदरासाठी शेतकरी आक्रमक; पुणे-बंगळूर महामार्गावर ‘चक्का जाम’.या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी जनमंच आणि प्रगती शेतकरी मंडळाच्या कार्यालयात शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू भाऊ वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या, समस्या आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना उद्देशून तयार केलेल्या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर यांना देण्यात आली..बैठकीला जनमंचचे प्रा. सुधाकर गौरखेडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास साबळे, आंतरभारतीचे प्रमोद राजनदेकर, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुपचे नंदकिशोर बबानिया यांच्यासह श्रीकृष्ण गुल्हाने, प्रफुल्ल मालधुरे, प्रवीण तीरकर, योगेश सोळंके, विलास गाडेकर, विनय भडांगे, श्याम पाचडे, राजू टिपरे, विनायकराव खंडारे, प्रशांत कडू, निरंजन गोरले, साहेबराव गोलाम, उमेश ठाकरे, विजू मोहोड आणि अरुण बोंडे उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.