Tanker Water For Crops: टोकावडे- मुरबाड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने अनेक परिसरातील शेती संकटात सापडली आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आवळेगाव येथील शेतकरी हेमा कमलु खाकर यांनी पीक वाचविण्यासाठी टँकरने पाणी आणून पिकांना दिले..यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतातील पिकांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिके करपू लागली असून, पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाची प्रतीक्षा करण्याऐवजी हेमा खाकर यांनी टँकरद्वारे पाणी आणून शेतात सोडले. पिके वाचविण्यासाठी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था करण्याची वेळ आली आहे. .Crop Damage Survey: २६५ तालुक्यांत ४३ टक्के पंचनामे : कृषिमंत्री भरणे.पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आवश्यक मदत व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे..Crop Damage Survey : २३ हजार गावांमध्ये नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती.दाणा भरणीमुळे धडपडवज्रेश्वरी: गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने भातपिकाला पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. वज्रेश्वरी, अकलोली, वेढे, घोटगाव, दुगाड, भिवाळी, गरवा व हलवर परिसरातील शेतकरी भातपीक वाचविण्यासाठी धडपड करत आहेत. यंदा सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्याने भातपिकाची वाढ चांगली झाली, मात्र आता शेतातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. पिकाला वाढीच्या काळात पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..आता पाऊस झाला नाही तर विहीर आणि कूपनलिकेच्या पाण्यावर पीक किती दिवस टिकवणार, हा प्रश्न आहे. पीक हातातून जाऊ नये म्हणून मोटारीने पाणी देण्याची धडपड सुरू आहे.- माधुरी भोईर, महिला, वेढेपाडा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.