Pune News : भारतासह जगभरात मुंबईचा दहींहडी उत्सव प्रसिध्द आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सावात कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात कोकण नगरच्या गोविंदांनी ही किमया साधली आहे. त्यामुळे ९ थरांचा मानवी मनोरा रचण्याचा जय जवान गोविंदा पथकाचा यापूर्वीचा विक्रम मोडला आहे. .देशभरात आज (ता. १६) श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहाने साजरी होत आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहत साजरा केला जातो. मुंबईचा दहीहंडीच्या प्रसिध्द दहीहंडी उत्सवात दहीहंडी फोडण्यासाठी सकाळपासूनच गोविंदा पथके प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईत दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मुंबईत वरूणराजा मुक्तपणे बरसत असला, तरी गोविंदा पथकांचा उत्साह जराही कमी झालेला नाही..Agriculture Research: रंगीत बटाटा प्रयोगाची तज्ज्ञांकडून पाहणी.मुंबईच्या दहीहंडी उत्सावाचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथे गंगनचुंबी हंड्या बांधल्या जातात. गेल्या काही वर्षात अशा उंचीवरच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतात. यंदा मात्र, संस्कृती दहीहंडी कार्यक्रमात कोकण नगरच्या गोविंदा पथकांनी १० थर रचत ऐतिहासिक कामगिरी केली आहे..Agriculture Input GST : शेती अवजारांवरील जीएसटी रद्द होणार? .१० थरांचा विश्वविक्रम केल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी या पथकाला २५ लाखांचे बक्षिस जाहीर केले. यावेळी सरनाईक म्हणाले की, आज माझा मुलगा पुर्वेश याचे स्वप्न पूर्ण झाले. याचा मला आनंद आहे. या पथकाला २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून मानवी मनोरे रचून दिलेली ही सलामी संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे..कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर लावल्यानंतर आर्यन गोविंदा पथकाने 'संस्कृती'च्या दहीहंडीला ९ थरांची सलामी दिली. दरम्यान, पहिल्या प्रयत्नात ९ थर लावणाऱ्या पथकाला ११ लाख रुपये, ८ थर लावणाऱ्या पथकाला २५ हजार आणि ७ थरांसाठी १५ हजार रुपये अशी बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.