BJP Mahayuti Majority In BMC Election: देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईवर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सत्ता मिळवताना दिसत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, मुंबईत महायुतीने निर्णायक बहुमताचा आकडा पार केला आहे. एकूण २२७ जागांपैकी महायुतीने १२० जागांवर आणि ठाकरेंच्या युतीने ७३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १४ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे ठाकरेंची मुंबईवरील २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे..मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी १,७०० उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. शिवसेनेची मुंबईवर १९९७ ते २०२२ दरम्यान तब्बल २५ वर्षे सत्ता राहिली. यामुळे उद्धव ठाकरेंचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक होती. या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकत्र आले. पण भाजपने जोरदार मोर्चेबांधणी करत ही निवडणूक लढवली आणि त्यांनी मुंबईवर सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. .राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ५२.९४ टक्के मतदान झाले. प्रभाग ११४ मध्ये सर्वाधिक ६५.५३ टक्के मतदानाची नोंद झाली. तर प्रभाग २२७ मध्ये सर्वात कमी म्हणजे २०.८८ टक्के मतदान झाले. .Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?.शिवसेनेची याआधी महानगरपालिकेत मोठी ताकद होती. त्यांनी २०१७ मधील निवडणुकीत ८४ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेत २०२२ मध्ये उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे ठाकरेंची ताकद कमी झाली. पण या निवडणुकीत मराठी मुद्यावर उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकत्र आले. पण त्यांचा प्रभाव दिसून आलेला नाही..Local Body Elections: जिल्हा परिषदेचा बिगुल वाजला.अँटी इन्कबन्सीगेल्या २५ वर्षांपासून मुंबई हा ठाकरे कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला. जेव्हा एखादा पक्ष अनेक वर्षे सत्तेत राहतो तेव्हा त्याच्याविरोधात वातावरण निर्माण होऊ लागते. त्याच अँटी इन्कबन्सीचा परिणाम या निवडणुकीत दिसून आल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात. .राज ठाकरेंशी युतीकाही राजकीय विश्लेषकांच्या मते, मनसेशी युती केल्यानंतर उद्धव यांच्यापासून उत्तर भारतीय मतदार दुरावले. मुंबई निवडणुकीत त्यांच्या पक्षाला अधिक जागा न मिळणार नसल्याचे हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे..मुंबईतील मागील निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. तर शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपला. आता जवळपास चार वर्षांनंतर मुंबईला नवीन महापौर मिळेल. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.