Devendra Fadnavis On Mumbai Rain: मुंबईत पावसामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि मुंबई- पुणे कनेक्टिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर कोसळलेली दरड या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठा खुलासा केला. मुंबईत पावसाळ्यात मिळून जेवढा पाऊस (२,३१८ मिमी) पडतो त्याच्या ४२ टक्के पाऊस अवघ्या सहा दिवसांत पडला. पावसासोबत ताशी प्रति तास ७५ किमी वेगाने वारे वाहिले. चार मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती, अशा सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यामुळे मुंबईकरांना आपत्तीला सामोरे जावे लागले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना सांगितले. .मुंबईसाठी १३ हजार कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा मुंबईसाठी १३ हजार कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार करण्यात आला असून तो केंद्र सरकारला सादर केला आहे. मुंबईतील २,०५० किमी लांबीच्या काँक्रीट रस्ते प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. २०२७ पर्यंत शहरातील ९५ टक्के रस्ते काँक्रीटचे असतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली..मॉन्सूनमध्ये मुंबईकरांना अनेक आपत्तींना सामोरे जावे लागते. ६ जुलैपर्यंतची आकडेवारी पाहिली तर कुलाबामध्ये ७३४ मिमी, सांतक्रूझमध्ये ८५६ मिमी इतका पाऊस पडतो. पण यावेळी सहा दिवसांत कुलाबामध्ये ८८२ मिमी आणि सांताक्रूझमध्ये ९८८ मिमी पाऊस झाला. या ठिकाणी संपूर्ण जुलै महिन्याच्या १११ टक्के आणि १०२ टक्के पाऊस झाला. केवळ चार दिवसांच्या पावसाचा विचार केला तर जवळपास ९० टक्के पाऊस चार दिवसांत झाला..Rain Andaj : उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता.मुंबईमध्ये दिल्लीतील एकूण संपूर्ण पावसाळ्यापेक्षा ११७ टक्के, पुण्याच्या ११३ टक्के, बंगळूरच्या संपूर्ण हंगामातील तुलनेत ९६ टक्के इतक पाऊस सहा दिवसांत पडला. येथे मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी ५ मृत्यू झाडे पडल्याने होतात. दरड कोसळून सरासरी ३ मृत्यू होतात. इमारती कोसळून सरकारी १३ मृत्यू होतात. मागच्या काळात मॅनहोलमध्ये पडून आतापर्यंत ७ मृत्यू झालेले आहे. मुंबईत अशा गोष्टींमुळे वारंवार अपघात होत असतात, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले..Monsoon Rain : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज.यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत की जुनी झाडे रिजनरेट करता येतील. यासंदर्भात झाडे काढली पाहिजेत. यावर्षी एक इमारत पडली. पण ती रिकामी केली होती. ज्या घरावर ही इमारत पडली; त्या लोकांनी घर सोडायला नकार दिला. यामुळे दुर्दैवी मृत्यूची घटना घडली. मिठी नदीतून ८३ टक्के गाळ काढण्यात आला. नाले सफाईही करण्यात आली होती, असे ते म्हणाले. .'कनेक्टिंग लिंक'ला कुठेही धक्का नाहीमुंबई- पुणे कनेक्टिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर दरड कोसळल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवला, असा टोला त्यांनी दाखवला..ही केवळ कनेक्टिंग लिंक नव्हे, तर आम्ही जगातला सगळ्यात रुंद बोगदा, भारतातील सर्वांत उंच केबल स्टेड पूल तयार करुन दाखवला. येथे ताशी १७० किमी वेगाने वारे वाहते. यावर वरून दरड कोसळली. ती पाण्याच्या कमानीवर पडली आणि कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली कोसळली. त्याचा ढिगारा तयार झाला. कुठेही केबल स्टेड पुलाला तडा गेलेला नाही. कुठल्याही बोगद्याला अडचण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले..'मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करु नका'पण लगेच असे चित्र दाखवले की कनेक्टिंग लिंक तुटली. पण १८ तासांमध्ये वाहतूक सुरु झाली. मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करु नका, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.