Mulshi Dam: पुणे जिल्ह्यात घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक सातत्याने सुरू आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी दिवसभर पावसाचा काही प्रमाणात जोर कमी झाला होता. .धरणक्षेत्रातील पर्जन्यमानात मुळशी अव्वल ठरले आहे. त्यापाठोपाठ टेमघर येथे १२७, गुंजवणी ११५, पवना ७४, निरा देवघर ६६, वडज ६३, पानशेत ६२, कळमोडी ५५, वरसगाव ५४, वडिवळे ४६, येडगाव ४० आणि डिंभे येथे ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय खडकवासला, कासारसाई, चासकमान, भामा-आसखेड, आंध्रा, नाझरे, भाटघर, वीर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, जिल्हेवाडी, घोड आणि उजनी धरणक्षेत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला..Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस.घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कायम असून लोणावळा येथे ११४, वळवण ९१, कुंडली ५५, शिरोटा ३३ आणि ठोकरवाडी येथे २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे नद्या-नाल्यांचा प्रवाह वाढला असून धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. मुळशी तालुक्यात आंबवणे येथे १२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. माले व पोमगाव येथे प्रत्येकी ७१, तर मुठे येथे ६६ मिलिमीटर पाऊस झाला. पौड, घोटावडे, पिरंगुट, कासारआंबोली, सावरगाव, कोळवण आणि माण परिसरातही चांगला पाऊस झाला..Pune Heavy Rain: मुसळधार पावसाने झोडपले; धरणांतून विसर्ग.राजगड तालुक्यात राजगड येथे ९३, विंझर ६५ आणि पानशेत येथे ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवेली, भोर, मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यांमध्येही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडलांमध्ये पावसाची नोंद झाल्याने खरीप पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र धरणक्षेत्र आणि नदीकाठच्या भागांमध्ये पाण्याची आवक वाढत असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे..जिल्ह्यातील धरणांतील पाणी स्थितीचोवीस तासांत पाण्याची नव्याने आवक : २८.७१ टीएमसीहंगामातील एकूण आवक : १०२.६४ टीएमसीसध्याचा उपयुक्त पाणीसाठा : ९७.४६ टीएमसीउजनी धरणाचा पाणीसाठा : उणेवरून ‘प्लस’मध्ये.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.