Nashik News: मुल्हेर परिसरात शुक्रवारी (ता. २०) सायंकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभर ढगाळ वातावरण असतानाच सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि काही क्षणांतच मुसळधार सरी कोसळू लागल्या. अनपेक्षितपणे झालेल्या या पावसामुळे बाजारपेठ, रस्ते आणि शेतमळ्यांमध्ये गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले..दिवसभर उन्हाळी-ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू असताना सायंकाळी काळ्या ढगांनी आकाश व्यापले. वाऱ्याचा वेग वाढू लागला आणि क्षणार्धातच पावसाच्या जोरदार सरी सुरू झाल्या. अवघ्या काही मिनिटांत रस्त्यांवर पाणी साचले. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी दुकानांचा किंवा इमारतींचा आडोसा घेतला. काही ठिकाणी वाहनचालकांचीही गैरसोय झाली..Unseasonal Rain: पोयनाडमध्ये ‘अवकाळी’चा आंबा पिकाला फटका .अचानक आलेल्या या पावसामुळे काही भागांत वीजपुरवठाही काही काळासाठी खंडित झाला. त्यामुळे अंधारात नागरिकांची गैरसोय झाली. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरात कांदा, गहू आणि हरभरा या प्रमुख पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली..Unseasonal Rain: उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर; निफाड, भुसावळ व चोपड्यात गारपीट.पिके सध्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना झालेल्या या पावसामुळे रोगराईचा धोका वाढला आहे.विशेषतः कांदा पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे कांद्याची रोपे मोठ्या प्रमाणात खराब झाली होती. त्यामुळे कांदा लागवड उशिरा करण्यात आली. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत..पावसामुळे शेतातच काढून ठेवलेली मक्याची कणसे भिजण्याची शक्यता निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांनी तातडीने शेतात धाव घेत ताडपत्रीच्या मदतीने कणसे झाकण्याचा प्रयत्न केला. काहींनी काढणीचे काम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.