Ahilyanagar Reservoir Level: अहिल्यानगर पाणलोटातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या मुळा धरणाची शंभर टक्के भरण्याकडे वाटचाल सुरू आहे. पाण्याची चांगली आवक होत असल्याने धरणात सोमवारी (ता. ३) सकाळी सहा वाजता ७८ टक्के पाणीसाठा झाला होता. .दरम्यान, जायकवाडी धरणातही ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने समन्यायी पाणी वाटपानुसार मुळा धरणातून पाणी सोडण्याची गरज उरलेली नाही. भंडारदरा व नीळवंडे धरणांतूनही आठवडाभरापासून विसर्ग सुरू आहे..Nilwande Dam: नीळवंडे धरणातून विसर्ग सुरू.जिल्ह्याच्या उत्तर भागात मुळा, भंडारदरा व नीळवंडे ही मोठी धरणे आहेत. दक्षिणेकडील तालुक्यांना पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातून पाणी मिळते. दक्षिण भागात पुरेसा पाऊस नसल्याने तेथील एकमेव मोठ्या सीना धरणात समाधानकारक पाणीसाठा नाही. मात्र, कुकडी प्रकल्पातून अतिरिक्त पाणी सोडल्याने सीना धरणात पाणी जमा होण्याची शक्यता आहे..दुसरीकडे, अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, कळसुबाई, घाटघर, पांजरे व रतनवाडी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे भंडारदरा व नीळवंडे धरणे भरली असून, दोन्ही धरणांतून गेल्या आठ दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. सव्वीस टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात पावसाळ्याच्या सुरुवातीला अत्यल्प पाणीसाठा होता. मात्र, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, आतापर्यंत सुमारे सव्वा तेरा टीएमसी पाणी जमा झाले आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरण्याकडे वाटचाल करत आहे. .Maharashtra Dam: राज्यातील ४९ धरणांतून विसर्ग.सोमवारी (ता. ३) सकाळी धरणात ७८ टक्के (२० टीएमसी) पाणीसाठा होता. लहित खुर्द (कोतूळ) येथे मुळा नदीपात्रातून ११ हजार ५८७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. मुळा धरणाच्या परिचालन सूचीनुसार १ ते १५ ऑगस्टदरम्यान धरणसाठा २२ हजार ८२६ दशलक्ष घनफूट (८७.७९ टक्के), तर १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान २४ हजार ८८५ दशलक्ष घनफूट (९५.७१ टक्के) ठेवून अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. १६ सप्टेंबर रोजी धरण १०० टक्के भरलेले ठेवण्याचे नियोजन आहे..समन्यायी पाणी वाटपाची टांगती तलवारही दूरदरम्यान, समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी धरणाची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडावे लागते. मात्र, सोमवारी जायकवाडी धरणातील जिवंत पाणीसाठा ८४.४६ टक्क्यांवर पोहोचल्याने मुळा धरणातून पाणी सोडण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे समन्यायी पाणी वाटपाची टांगती तलवारही दूर झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.