Mula Dam Water Storage News: मुळा धरणातील पिण्याचा पाणीसाठा १५ जूनपर्यंत राखीव ठेवला जातो. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी यंदा ऑगस्ट २०२६ अखेर पिण्याचा पाणीसाठा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. धरणात आजअखेर १२५५१ (४८.२७ टक्के) दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. पैकी अचल साठा ४५०० दशलक्ष घनफूट वगळता ८०५१ (३७.४४ टक्के) पाणीसाठा वापरण्यासाठी उपलब्ध असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगितले जात आहे..शिवाय जलाशय व कालव्यांवरील उपसा योजनांना खरीप आणि रब्बी हंगामात पाणी वापराची परवानगी आहे. उन्हाळी हंगामात कोणत्याही योजनांना पाणी उपसा करण्याची परवानगी नाही. त्यामुळे पाटबंधारे राहुरी, पारनेर तालुक्यातील २२ योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना ‘महावितरण’ला दिल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात २६ टीएमसी क्षमतेचे मुळा धरण हे सर्वांत मोठे धरण आहे. यंदा ‘एल निनो’चा धोका ओळखून पाटबंधारे विभागातर्फे मुळा धरणातील पाणीसाठा जपून व काळजीपूर्वक वापरण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतीचे, पिण्याचे आणि औद्योगिक पाणी काटकसरीने वापरावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. .Dudhana Dam Water Level: निम्न दुधना प्रकल्पामध्ये ३९.७७ टक्के पाणीसाठा.हवामान खात्याने एल निनोमुळे यंदा तापमान वाढीसह दुष्काळाचा अंदाज व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर २०२६ मॉन्सून हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. उशिराने पाऊस तसेच मोठा खंड पडण्याची शक्यता गृहीत धरून शासनाने पाणीसाठा काटकसरीने वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत..Ujani Dam: उजनी धरण ‘उणे पातळीत’.मुळा धरणात सद्यःस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा साठा शिल्लक आहे. सिंचन व बिगर सिंचनाला पुरेपूर पाणीपुरवठा केला जात आहे. उजव्या कालव्याद्वारे २९ एप्रिल २०२६ रोजी उन्हाळी हंगामातील सिंचनाचे आवर्तन सुरू केले आहे. ४० दिवस आवर्तन चालणार आहे. त्यासाठी ४.८ टीएमसी पाणीखर्च होणार आहे. सातत्याने ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामुळे बाष्पीभवन वाढले आहे. उजव्या कालव्याद्वारे तिसरे आवर्तन सुरू आहे. डाव्या कालव्याद्वारे तीन आवर्तने झाली आहेत. पंधरा दिवसांनंतर डाव्या कालव्याद्वारे उन्हाळी आवर्तन सुरू होऊ शकते. सिंचनाचा पाणीखर्च, वाढते बाष्पीभवन, एल निनोचा धोका यामुळे टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी मुळा पाटबंधारे विभाग सतर्क झाला आहे..पाण्यासाठी दररोज दोन तास योजनांना वीजपुरवठामुळा जलाशयावरील उपसा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना बुधवारी (ता. ६) ‘महावितरण’ला देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राहुरी तालुक्यातील ताहाराबाद, मल्हारवाडी, दरडगाव थडी, चिखलठाण, वांबोरी, धामोरी, म्हैसगाव, खडांबे, जांभळी, कणगर, गडधे आखाडा, चिंचाळे, बाभूळगाव, वरवंडी, कुरणवाडी, घोरपडवाडी, बारागाव नांदूर, तसेच पारनेर तालुक्यातील वनकुटे, खडकवाडी, पळशी, तास, गाडकवाडी आदी गावांमधील उपसा योजनांचा समावेश आहे. पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी दररोज दोन तास योजनांना वीजपुरवठा केला जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.