Agricultural Losses: गुरुवारी (ता. ४) सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने रावेर व मुक्ताईनगर तालुक्यांतील हजारो एकरवरील केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. केळीचे घड कापणीवर आलेले असतानाच निसर्गाने घातलेल्या या घालामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतबांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. प्रशासकीय यंत्रणेला युद्धपातळीवर १०० टक्के पंचनामे पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत..आमदार पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा, चिंचखेडा बुद्रूक, निमखेडी बुद्रूक, इच्छापूर, टाकळी, महालखेडा, चारठाणा, रावेर तालुक्यातील रेंभोटा, निंबोल, खिर्डी व एनपूर या गावांना भेटी दिल्या. अनेक शेतांत केळीच्या बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या अश्रूंचा बांध फोडत आमदारांसमोर आपबिती मांडली..Banana Crop Damage: रावेर तालुक्यात केळीचे ७५ कोटींचे नुकसान.जिल्हाधिकाऱ्यांशी संवादशेतकऱ्यांची बिकट अवस्था पाहून आमदार पाटील यांनी पाहणी दौऱ्यावर असतानाच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. नुकसानग्रस्त भागाची भीषणता लक्षात आणून देत त्यांनी संपूर्ण परिसरात युद्धपातळीवर पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले. कोणताही पात्र शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता महसूल व कृषी विभागाने घ्यावी, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या..Banana Crop Damage: सातपुड्याच्या पायथ्याच्या केळी बागा जमीनदोस्त.वाहतूक विस्कळीतवादळाने शेतीचेच नाही, तर अनेक गावांतील मुख्य रस्त्यांवर व अंतर्गत रस्त्यांवर मोठ-मोठी झाडे उन्मळून पडल्याने या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. वीजवाहिन्यांचेही नुकसान झाले. यावर प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून रस्ते मोकळे करावेत व जनजीवन पूर्वपदावर आणावे, असे निर्देशही आमदारांनी दिले..अधिकारी-पदाधिकाऱ्यांची उपस्थितीया पाहणी दौऱ्यात आमदारांबरोबर विभागीय प्रांताधिकारी काकडे, तहसीलदार वखारे, कृषी अधिकारी, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, उपतालुकाप्रमुख शिवाजी पाटील, सतीश नांगरे, सूर्यकांत पाटील, नरेंद्र पाटील, गणेश थेटे, संतोष जमाव, राहुल बगे, भूषण पाटील, आकाश पाटील यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते..शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. संकटाच्या या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. ऑनलाइन विमा प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे जे शेतकरी यापूर्वी वगळले गेले आहेत, त्यांनाही न्याय मिळवून दिला जाईल. वास्तविक, नुकसानीनुसार योग्य भरपाई मिळावी, यासाठी शासन व विमा कंपनीस्तरावर वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा करेन.- चंद्रकांत पाटील, आमदार, मुक्ताईनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.