Pune News: पुणे येथील हवामान प्रशिक्षण संस्था (एमटीआय) मागील आठ दशकांहून अधिक काळापासून राष्ट्रीय व प्रादेशिक स्तरावर हवामान अंदाज, जलवायूशास्त्र व संबंधित सेवा पुरवण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करत आहे. भारतीय हवामान विभागांतर्गत कार्यरत असलेल्या या संस्थेने आतापर्यंत सुमारे १९ हजारांहून अधिक भारतीय अधिकारी व कर्मचारी, तसेच ३०० पेक्षा अधिक परदेशी प्रशिक्षणार्थींना विविध अभ्यासक्रमांतून प्रशिक्षण दिले आहे..भारतीय हवामान विभागामध्ये हवामान प्रशिक्षणाची सुरुवात १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाली. जागतिक हवामान संघटनेने १९८६ मध्ये पुणे येथील हवामान प्रशिक्षण केंद्र आणि नवी दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रास प्रादेशिक हवामान प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता दिली. ती सामान्य हवामानशास्त्र, हवामान व जलवायूशास्त्र, कृषी हवामानशास्त्र, विमान वाहतूक हवामानशास्त्र, भूकंपशास्त्र तसेच हवामान उपकरणे व दूरसंचार या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देत आहेत..Weekly Weather: कमाल, किमान तापमानात वाढ शक्य.तसेच, भारतासह आफ्रिका-आशिया व पॅसिफिक प्रदेशातील अनेक देशांसाठी मनुष्यबळ क्षमता विकासाचे महत्त्वपूर्ण कार्य ती करत आहेत.हवामान अंदाज अधिक अचूक, वेळेवर आणि उपयुक्त ठरावा, यासाठी पुणे येथील संस्थेत विविध स्तरांवरील नियमित व विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत..Maharashtra Cold Wave: ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली.या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रगत हवामानशास्त्र प्रशिक्षण अभ्यासक्रम, हवामान अंदाजकार प्रशिक्षण अभ्यासक्रम, एकात्मिक हवामानशास्त्र प्रशिक्षण अभ्यासक्रम, तसेच हवामानशास्त्रज्ञ श्रेणी–दोन व थेट भरती झालेल्या वैज्ञानिकांसाठीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. याशिवाय मूलभूत व घटकाधारित प्रशिक्षण अभ्यासक्रमही येथे आयोजित केले जातात..अचूक, वेळेवर आणि उपयुक्त हवामान सेवा देण्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ घडविण्यात पुणे येथील हवामान प्रशिक्षण संस्था गेल्या आठ दशकांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावत आहे.जी. के. सवाईसर्जे, वैज्ञानिक, हवामान प्रशिक्षण संस्था, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.