Nagpur News : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेत पासचे दर वाढविले होते. मात्र प्रवाशांची मागणी लक्षात घेता योजनेचे दर एसटीने कमी केले आहेत. महामंडळाने नवीन दरपत्रक सोमवारी काढले..महामंडळाने २४ जानेवारी २०२५ पासून विविध बससेवांच्या प्रतिटप्पा दरात वाढ केली होती. त्यानुसार नवीन टप्पा दरपत्रकाप्रमाणे ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेचे पासचे दर १ फेब्रुवारीपासून सुधारित करण्यात आले होते..Solapur Bus Port : प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपमधून अत्याधुनिक बसपोर्ट.या योजनेच्या पास दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. प्रवाशांनी पासचे दर कमी करण्याबाबत मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेऊन महामंडळाने मंगळवारी (ता. ७) मध्यरात्रीपासून दर कमी केले आहेत..४ दिवसांच्या पासचे दर प्रौढांसाठी १८१४ रुपये होते. ते आता १३६४ रुपये करण्यात आले आहेत. मुलांसाठी ९१० रुपये आधी होते. नवीन दर ६८५ रुपये करण्यात आले आहे. तसेच सात दिवसांच्या पासचे दर हे ३ हजार १७१ रुपये प्रौढांसाठी होते. ते आता २ हजार ३८२ रुपये करण्यात आले आहेत. .ST Bus : लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी आता लालपरीत सीसीटीव्ही.मुलांसाठी १५८८ रुपये होते, ते आता ११९४ रुपये केले आहेत. यात साधी बस, जलद, रात्रसेवा, आंतरराज्य शहरी मिडीबसचा समावेश आहे. शिवशाही आसनी बसमध्ये पूर्वीच्या दराच्या तुलनेत प्रौढांसाठी ७१५ रुपये कमी करण्यात आले आहेत. .तर मुलांसाठी ३५८ रुपये कमी केले आहेत. हे पास ४ दिवसांसाठी आहेत. सात दिवसांच्या पासमध्येसुद्धा अनुक्रमे १२५४ आणि ६२७ रुपये कमी करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.