Agricultural Procurement: शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत येथील केंद्रांवर ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार करून मोठा अपहार झाला आहे. शासनाने विशेष चौकशी पथक नियुक्त करून ज्वारी खरेदी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडे तक्रारीद्वारे केली आहे..तक्रारीत म्हटले की, देऊळगावराजा तालुक्यामध्ये शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत अधिकृत खरेदी केंद्रावर सन २०२६-२७ मधील ज्वारी खरेदीमध्ये केंद्र चालक, खासगी व्यापारी आणि दलाल यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणात घोळ केला आहे. .Jowar Procurement: बुलडाण्यात ज्वारी खरेदीच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह.तालुक्यातील कृषी विभागाची आकडेवारी आणि शेतकऱ्यांचे सातबारे तपासले तर तालुक्यात ज्वारीचा पेरा अत्यंत नगण्य असताना शासकीय खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल ज्वारी खरेदी झालीच कशी? हा प्रश्न उपस्थित झाला आहे..Onion Procurement Scam: कांदा खरेदीत घोटाळा?.बाहेरच्या राज्यातून ज्वारी आणून शासकीय खरेदी केंद्रावर विकली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ज्वारी खरेदीतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून यामध्ये दोषी असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे..तसेच जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत संबंधित केंद्रांना चुकारे देण्यात येऊ नये.अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजेश इंगळे यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.