Latur News: ‘महावितरण’ने नोव्हेंबर महिन्याची व थकीत वीजबिलांची वसुली मोहीम हाती घेतली असून गेल्या २५ दिवसांत केवळ ६५ टक्केच वसुलीचे उदिष्ट साध्य करण्यात यश मिळाले आहे. उर्वरित ५ दिवसांत ‘महावितरण’ला २० कोटी २ लाख रुपयांची थकबाकी वसुली करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. म्हणून वीजबिल न भरल्यामुळे आजपर्यंत १ हजार ६९ वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे..‘महावितरण’च्या लातूर मंडळासाठी वरिष्ठ कार्यालयाने लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडील वीजबिल वसुलीसाठी नोव्हेंबर महिन्याचे चालू बिलाचे ५८ कोटी १८ लाख व थकबाकीचे १०१ कोटी ९३ लाख असे एकत्रित १६० कोटी ११ लाख रुपयांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ते गाठताना मागील २५ दिवसांत केवळ ३७ कोटी ९८ लाख रुपयांची वीजबिल वसुली झाली. हे प्रमाण खूपच कमी असून येणाऱ्या पाच दिवसांत उर्वरित थकबाकी सोडून चालू महिन्याचे २० कोटी २ लाख रुपयांची वसुली करणे कसरतीचे ठरणार आहे..Electricity Bills Dues : छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित.वसुलीसाठी मंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी घरोघरी भेटी देत आहेत. मात्र, जिल्ह्यातील वीजग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आजपर्यंत १ हजार ६९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी आपल्या थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे..Power Supply Cut: नाशिक, जळगाव, आणि अहिल्यानगरमध्ये शेतीचा वीजपुरवठा खंडित; शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ.दिरंगाईमुळे होतेय कारवाईलातूर मंडळांतर्गत येणाऱ्या लातूर विभागातील लघुदाब वर्गवारीच्या वीजग्राहकांकडे नोव्हेंबर महिन्याचे ३२ कोटी २८ लाख थकीत असून कालपर्यंत २२ कोटी ४ लाख रुपये वसुली झाली आहे. निलंगा विभागातील वीजग्राहकांकडे ९ कोटी ६४ लाख थकीत असून कालपर्यंत ५ कोटी ७८ लाख रुपये वसुली झाली आहे. .तर, उदगीर विभागातील वीजग्राहकांकडे १६ कोटी २६ लाख थकीत असून कालपर्यंत १० कोटी १६ लाख रुपये वसुली झाली आहे. वसुलीचे हे प्रमाण आतापर्यंतचे अत्यल्प प्रमाण आहे. थकबाकीदार वीजग्राहकांना एसएमएसद्वारे, प्रत्यक्ष फोन करून तसेच वीजकायद्यान्वये रीतसर नोटीस देऊन कालावधी उलटून गेला, तरीही वीजग्राहक बिल भरण्यास दिरंगाई करत असल्याचे दिसून येत आहे, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.