Public Alert: आर्थिक वर्षाचा शेवटचा मार्च महिना असल्याने महावितरण कंपनीने थकीत वीजबिल वसुलीसाठी कंबर कसली आहे. ‘आला आहे मार्च एंडिंग, ठेवू नका बिल पेंडिंग’ या मोहिमेंतर्गत जळगाव परिमंडलात धडक कारवाई सुरू झाली आहे. वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद न देणाऱ्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ३४ हजार ७२१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या महिन्याभरात खंडित करण्यात आला. त्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, वसुलीची मोहीम आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. आधीच उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागत असताना त्यात बिलाअभावी वीजपुरवठा खंडित झाल्यास अधिक दाह ग्राहकांना सोसावा लागेल. .महावितरण कंपनीचा आर्थिक डोलारा ग्राहकांकडून मिळणाऱ्या बिल भरणा महसुलावर अवलंबून असतो. वीज खरेदीसह विविध देणी देण्यासाठी वसुली आवश्यक असल्याने मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी हे स्वतः परिमंडलात दौरे करून थकबाकीचा आढावा घेत आहेत. सध्या सर्व अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानावर असून, एका महिन्याचे बिल थकीत असले तरी नियमानुसार वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली जात आहे..Electricity Bills: वीज ग्राहकांना नऊ महिन्यांत मिळाली ९ कोटी रुपयांची सूट.वीजचोरीवर नजरज्यांचा वीजपुरवठा खंडीत आहे, असे थकबाकीदार जर शेजाऱ्यांकडून वायर किंवा केबलद्वारे वीज वापरताना आढळले तर वीज देणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र पथकांद्वारे तपासणी सुरू आहे. ग्राहकांनी अशा अवैध मार्गांचा अवलंब न करता कायदेशीररीत्या बिलाचा भरणा करावा, .Online Electricity Bills : घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढला कल.असा इशारा कंपनीने दिला आहे. ग्राहकांची सोय व्हावी म्हणून या महिन्यात सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार आहेत. तसेच, ग्राहकांनी mahadiscom.in ही वेबसाइट किंवा मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या ऑनलाइन बिल भरून सहकार्य करावे. मार्च अखेरची वाट न पाहता कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकी त्वरित भरावी, असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे..धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांची स्थिती पाहता धुळे मंडलात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व वर्गवारीतील ८८ हजार ६३ ग्राहकांकडे ३४ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे. पैकी २२ हजार ७४५ ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या महिनाभरात खंडित करण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.