Jalgaon News: खानदेशात सध्या आगाप मृग बहर केळी लागवड सुरू आहे. मृग बहरातील नियमीत केळी लागवड जूनमध्ये सुरू होईल. यंदा केळी लागवड खानदेशात कमी होवू शकते, असे संकेत आहेत. केळीच्या उतिसंवर्धित रोपांची मागणीही घटली असून, कंद व रोपांचा पुरवठा सुरळीत आहे. .केळी पिकास आपत्ती, रोगराई व बाजारपेठेतील अस्थिरता याचा मोठा फटका बसत आहे. यामुळे लागवडीत वाढ दिसत नाही. किंचित घट होईल. यात शेतकरी केळी पिकावरील खर्च कमी करण्याचे नियोजन करीत आहेत. केळीचे दर सध्या स्थिर आहेत. कापूस व इतर पिकांमध्येही शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला आहे. कारण दर कमी अधिक झाले. केळी पीकही शेतकऱ्यांना परवडले नाही. .Banana Plantation : खानदेशात केळी लागवडीस गती.कांदेबाग केळी व मृग बहर केळी उत्पादन बऱ्यापैकी आले, पण दर अपेक्षित मिळाले नाहीत. गतवर्षी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत केळी दरांवर मोठा दबाव होता. केळीला या कालावधीत प्रति क्विंटल सरासरी ३०० रुपये दर मिळाला. यात बाजार सतत अस्थिर होत आहे. इराण अस्थिर आहे. युक्रेन अशांत आहे. याचा थेट परिणाम केळी दरांवर खानदेशात होतो. कारण सर्वाधिक केळी निर्यात इराणमध्ये होते. मध्यंतरी इस्राईल व पेलेस्टीन युद्धाचीही झळ केळी पिकास बसली होती. यामुळे जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची लागवड घटत आहे..Banana Plantation: मृग बहर केळी लागवडीसाठी रोपांची मागणी अल्प.कमी लागवडीत काटेकोर व्यवस्थापनशेतकरी कमी लागवड करून अधिकाधिक उत्पादन घेऊ, असे नियोजन करीत आहेत. या केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू होते. तर कांदेबाग केळीची काढणी दसरा सणापासून सुरू होत असते. कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागात केली जाते..तर मृग बहर केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात केली जाते. खानदेशात गेल्या हंगामात मृग बहर केळीची लागवड सुमारे ८० हजार हेक्टरवर झाली होती. यंदा ही लागवड सुमारे ७० ते ७५ हजार हेक्टरवर होईल, अशी स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.