सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?तुमच्या, आमच्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आज अडचणीतशेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा८० हजार कोटींचा शक्तिपीठ करण्यापेक्षा ८० हजार कोटी देऊन तातडीने शेतकऱ्यांना सरसकट कजर्माफी द्यावी.Farm Loan Waiver : शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. काळ्या मातीशी इमान राखणारा आणि तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आज अडचणीत आहे. त्याला तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा. सरकारने याबाबत काही पाऊल उचलले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला आहे. त्या मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) कोल्हापुरात पत्रकाराशी बोलत होत्या..सरकारने ८० हजार कोटींचा शक्तिपीठ करण्यापेक्षा ८० हजार कोटी देऊन तातडीने शेतकऱ्यांना सरसकट कजर्माफी द्यावी. ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकरी कर्तुत्वाने स्वतः कसा उभा राहील? यासाठी प्रयत्न केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. .Marathwada Heavy Rainfall: मराठवाड्यातील ७५ मंडलांत अतिवृष्टी.शेतकरी प्रश्नी अमित शहांची घेतली होती भेटमे मध्ये पाऊस सुरु झाला. जून- जुलैमध्ये अधिवेशन सत्र झाले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता. सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र सरकारने काही केले नाही. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे दोन जबाबदाऱ्या आहेत. ते गृहमंत्री आहेतच. त्यासोबतच ते सहकारी मंत्री आहेत. राष्ट्रवादीच्या आठही खासदारांनी त्यांची भेट घेतली होती. ही जुलै महिन्याची गोष्ट आहे. आम्ही त्यांच्याकडे विनंती केली होती की महाराष्ट्राच्या सरकारला सांगावे, ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. ही मागणी राष्ट्रवादी सातत्याने दोन महिने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडे करत आहे. पण सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका त्यांनी केली..सरकारवर हल्लाबोलसरकार एक वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये सांगत होते. आम्हाला सत्ता द्या, आम्ही सरसकट कर्जमाफी करु. हा शब्द त्यांनी ऑक्टोबरआधी दिला होता. पण पुढचा ऑक्टोबर आला तरी काही नाही. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करणे, यासाठी सरकारने खूप उशीर केला असल्याचे सुळे म्हणाल्या. .Agriculure Loan Waiver: ‘शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा’ .सरकारला शक्तिपीठ महामार्ग सारखे मोठे पायाभूत प्रकल्प हवे आहेत. यासाठी फाईल लगेच हालते. निधीही असतो. पण छोटे रस्ते, कामे गरजेची असतात. त्याकडे सरकारचे लक्ष नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळतात का?. लाडकी बहीणचे योजनेमधील नावे कमी होत आहेत. पुण्यात क्राईम, पायाभूत सुविधा कोलमडली आहे. हिंजवडीचा प्रश्न तुम्ही पाहिला आहेच, असे सांगत त्यांनी राज्यातील अनेक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला..आता नवा ट्रेंड....फोन करणे, धमक्या देणेसरकारच्या विरोधात गेले तर आयकर, ईडीची नोटीस येते. ते शक्य नाही झाले तर नवीन ट्रेंड आहे, फोन करणे, धमक्या देणे. मला यात काही आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्राच्या पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे. पण पोलिसांवर त्यांची भीतीच सरकारमध्ये राहिली नाही. गुंडांना सुरक्षा दिली जाते. १२ वर्षे जेलमध्ये असणाऱ्यांना सुक्षा पुरवली जाते, हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला..मराठा आरक्षण प्रश्नी काय म्हणाल्या?मराठा आरक्षणावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मी मांडला आहे. जी संविधानानुसार आरक्षणे दिली आहेत, ती तशीच राहणार, असे त्यांनी नमूद केले. गॅझेटचा परिणाम किती होईल? याबाबत संभ्रम आहे. त्यासाठी तुम्ही सर्वपक्षीय बैठक बोलवा, अशी मागणीही त्यांनी केली..खराब रस्त्यांच्या प्रश्नावरही त्या बोलल्या. गडकरींनी देशात चांगले रस्ते केले आहेत. आपले राज्य का करु शकत नाही? असा सवाल त्यांनी केला.कोल्हापूर दौऱ्याविषयी त्या म्हणाल्या की, माझ्या वडिलांचे आजोळ कोल्हापूर आहे. मी कोल्हापूरला आले की अंबाबाईचे दर्शन घेते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.