Chhatrapati Sambhajinagar News: सध्या सर्वदूर आंबा झाडे भरगच्च मोहराने बहरलेली दिसून येत आहेत. या मोहराचे परपरागीकरण चांगले होण्यासाठी हातांनी अथवा झाडूने हळुवारपणे फांद्या हलविल्यास फळधारणा वाढीसाठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन हिमायतबाग येथील केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी केले..टाकळी राजेराय (ता. खुलताबाद) येथील केसर आंबा बागेस सोमवारी (ता. २६) दिलेल्या भेटीप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. या वेळी आंबा बागायतदार पंडितराव क्षीरसागर, किरण मालोदे, रविकांत काळे, मच्छिंद्र राठोड, नाना पवार आदींची उपस्थिती होती..Mango Protection : आंब्याच्या फळाला कागदी पिशवीचा आधार.या वेळी डॉ. पाटील म्हणाले, ‘‘पाऊसमान चांगले झाल्याने आंबा बागा सर्वदूर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बहरलेल्या दिसून येत आहेत, काही ठिकाणी बाजरी आकाराची फळधारणा झालेली दिसून येत आहेत, अशा ठिकाणी परागीकरण होऊन नर फुले सुकलेली आहेत. यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन भुरीचा धोका टाळण्यासाठी झाडाच्या फांद्या.Mango Flowering: आंब्याच्या उत्पादनासाठी मोहराचे संरक्षण गरजेचे.हळूवारपणे झाडूच्या साहाय्याने हलविल्यास सुकलेली फुले पडून आणि इतर फुलातील जिवंत असलेले परागकण मादी फुलांवर पडून फळधारणा वाढीसाठी मदत मिळू शकते..केसर आंबा बागेत ५० टक्के बाजरी आकाराची फळे झाली असल्यास पाणी व्यवस्थापन करणेदेखील फळगळ थांबविण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.’’या वेळी मोठ्या संख्येने आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.