Mosambi Farming: आंबिया बहरातील मोसंबी फळगळ कमी करण्यासाठी उपाय
Mosambi Orchard Management: मोसंबीमध्ये आंबिया बहर हा व्यापारीदृष्ट्या अधिक फायदेशीर मानला जातो. या बहरातील फळांना आकर्षक रंग, अधिक रसाळपणा, उत्तम गुणवत्ता आणि चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे बहुतांश उत्पादक आंबिया बहराला अधिक प्राधान्य देतात.