Chhatrapati Sambhajinagar News: राज्यात मोसंबीचे आगार म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. परंतु आता हवामानातील बदलाच्या संकटांमुळे जुन्या आणि नव्याने लावलेल्या बागा शेतकरी काढून टाकू लागले आहेत. फळपीक टिकविण्याचा प्रयत्न करणारे बागायतदार अशा विदारक स्थितीमुळे हतबल झाल्याचे पाहायला मिळते आहे..अति जास्त व अवेळी पडलेला पाऊस, वातावरणातील बदल, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, अतिपावसामुळे पिकांची व फळांची वाढ खुंटणे, देठ बंद पडणे, मजुरांचा वाढलेला खर्च, एकूणच उत्पादनाचा वाढलेला खर्च, उत्पादन घटूनही तीन वर्षांपासून सातत्याने दरात होत असलेली घट, शासनाच्या योजनांचा या फळपिकाला आधार न मिळणे, शास्त्रोक्त ज्ञान व सजगता निर्माण करण्यासाठी आवश्यक वा पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नसणे, संशोधनाच्या पातळीवर नगण्य हालचाली, संशोधनासाठी आवश्यक साधने व तज्ज्ञ मनुष्यबळाचा अभाव आदी कारणे मोसंबी बागा काढणाऱ्यांच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या माहितीतून पुढे येत आहेत..जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यांत मोसंबी काढण्याचे प्रमाण जास्त आहे. रोजगार हमी योजनेतूनही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोसंबी लागवड झाली आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हे प्रमाण सुमारे दहा टक्के असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन वर्षांपासून होत असलेला जास्त पाऊस मोसंबी फटका बसलेल्या शेतकऱ्यांना उसासारख्या पिकांकडे आकर्षित करताना दिसतो आहे..Orange Orchard Crisis: संत्र्याचा मृग बहर वाशीममध्ये संकटात.ताण नियोजनावर परिणामनैसर्गिक आपत्तीने मराठवाड्यातील इतर पिकांबरोबरच मोसंबीचे ताण नियोजनही बिघडून टाकलं आहे. मृग बहरासाठी मेमध्ये अल्पकाळात ताण बसतो, मात्र ५ मेपासूनच सुरू झालेल्या पावसाने बहरासाठी सिंचनाच्या सोईमुळे मृग बहराचे नियोजन करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे गणित बिघडवले. अर्थात, काही सिंचनाची सोय नसलेल्या मोसंबी बागांना या पावसाचा ताण तोडण्यासाठी व बहर फुटण्यासाठी फायदाही झाला. दुसरीकडे ऑक्टोबरमध्येही आलेल्या पावसाने आंबिया बहराच्या ताणावर परिणाम केला. त्यामुळे वाफसा स्थिती येण्यास विलंब होऊन बहरासाठी ताण देण्याचा कालावधी लांबला. याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असून मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येते आहे..उत्पादनात घट; दर मात्र पडतेचयंदा मोसंबी उत्पादनात घट असली तरी दर मात्र दहा ते अठरा हजार रुपये प्रति टनापर्यंत तर उत्तम दर्जाच्या मोसंबीला २५ हजार रुपये प्रति टनापर्यंत मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तीन वर्षांपासून सातत्याने दरात घट होत असून यंदाची दराची स्थिती सर्वांत कमी आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत मोसंबीला तीस ते चाळीस हजार रुपये प्रति टनाचा दर मिळत होता. तिथे आज पंधरा ते वीस हजारांच्या आतच प्रति टनाला दर मिळतो आहे. त्यामुळे खास करून अलीकडच्या पाच ते दहा वर्षांत मोसंबी लागवड केलेल्या व काही जुन्याही मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागा काढणे सुरू केले आहे..Agriculture Crisis: सणासुदीला अस्मानीचे संकट कायम.कीड-रोगांचेही आक्रमणमोसंबी म्हणजे राजा पीक, अशी ओळख. मात्र भौगोलिक मानांकन मिळालेल्या मोसंबीचे उत्पादन आता सहजासहजी घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नसल्याची स्थिती आहे. नैसर्गिक आपत्ती सोबतच फळगळ, डायबॅक, कोळशी, कोळी कीड यामुळे गत काही वर्षांपासून मोसंबी उत्पादक शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत..जिल्हानिहाय क्षेत्र व उत्पादकता (हेक्टरी टनात) (२०२४-२५)जिल्हा क्षेत्र उत्पादन उत्पादकताबीड ३३६७ ३८३८३ ११.४०छत्रपती संभाजीनगर २४११३ ३६१६९५ १५जालना २९५४५ ३५४५५१ १२.सुरुवातीला २५ ते ३० टक्क्यांपर्यंत फळगळ झाली. बहर नियोजन बिघडले. मंगू, सीट्रस कँकर, खोलगट डाग आदींचे आक्रमण वाढले. थंडी वाढली, मागणी घटली, व्यापारी बागा घेईना. पावसामुळे एकाच वेळी मालाची तोड होते आहे. सारं मोसंबी बाबतीत विपरीतच घडते आहे.श्रीराम बनकर, मोसंबी उत्पादक, शृंगारवाडी ता. पैठण.शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्र झालेल्या मोसंबी उत्पादकांना ग्रेडिंग-पॅकिंगच्या माध्यमातून मूल्यवर्धनासाठी विक्रीची साखळी निर्माण करून देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. गहिनीनाथ कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना.मोसंबी म्हणजे राजा पीक. त्याला जीआयपर्यंत घेऊन गेलो. परंतु अनेक बाबतीत या पिकाकडे होणारे दुर्लक्ष या राजा फळ पिकाची वाताहत करताना दिसते आहे. पांडुरंग डोंगरे, अभ्यासू मोसंबी उत्पादक, कर्जत, जि. जालना.उत्तर भारतात हिरव्या मोसंबीची मागणी असते. दक्षिण भारतात जिथे पिवळ्या मोसंबीची मागणी असायची, तिथं आता हिरवीच मोसंबी मागितली जाते. यंदा अति पावसाने बहर नियोजनासोबत सारंच विस्कळीत झालं. त्यातही मोसंबीला टिकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.गणेश पडूळ, मोसंबी उत्पादक, अंतरवाला, ता. जि. जालना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.