MGNREGA Success: शंभरहून अधिक कुटुंबे ‘मनरेगा’तून झाली लखपती
Rural Transformation: रवींद्र इंगोले यांच्या हुशारीचे, कल्पकतेचे, व्यावसायिक दृष्टिकोनाचे आणि तसेच प्रशिक्षणाच्या कौशल्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. कारण गरिबातील गरिबाला रोजीरोटी देण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून अनेक व्यक्ती किंवा कुटुंबाला लखपती बनविण्याचे काम रवींद्र यांनी केले आहे.