Solapur News: येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने आयोजित ५५ व्या कृषी प्रदर्शनातील ‘डॉग शो’ला यंदाही सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनात पार पडलेल्या या स्पर्धेत २४ विविध जातींच्या ३०० हून अधिक देशी-विदेशी श्वानांनी आपला रुबाब दाखवला. होम मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याने प्राणीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले..या प्रदर्शनात सायबेरियन हस्की, रॉटविलर, जर्मन शेफर्ड, गोल्डन रेट्रीवर, ग्रेट डेन, डॉबरमॅन अशा विदेशी जातींसोबतच भारतीय अस्मिता असलेल्या मुधोळ हाऊंड, पश्मी हाऊंड आणि कॉरवॉन हाऊंड या देशी जातींच्या श्वानांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः ''सीइझू'' जातीच्या तब्बल २५ श्वानांनी या शोमध्ये विशेष आकर्षण निर्माण केले होते. केवळ श्वान दाखवणे इतकाच हा सोहळा मर्यादित नव्हता, तर परीक्षकांनी प्रत्येक श्वानाच्या शरीराची ठेवण, डोळे, दात, उंची, केसांचा पोत आणि त्यांच्या हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण केले..Dog Blood Transfusion: श्वानामध्ये रक्त संक्रमण यशस्वी.फॅन्सी डॉग शो, फॅशन डॉग शो आणि ८ ते १६ वयोगटातील मुलांसाठी ''ज्युनिअर हँडलिंग कॉम्पिटिशन''चे आयोजन करण्यात आले होते. बेस्ट इंडियन ब्रीड, बेस्ट पपी इन शो आणि बेस्ट हँडलर अशा श्रेणींमध्ये विजेत्यांना ट्रॉफी, रोख रक्कम आणि डॉग फूड बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. शोचे उद्घाटन देवस्थानचे विश्वस्त मल्लिनाथ मसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सिद्धेश्वर बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, सोमनाथ शेटे उपस्थित होते. पुण्याचे संजय मुथुर, डॉ. सचिन देशमुख आणि डॉ. तृप्ती देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ड्रल्स, कॉर्निव्हल आणि सिग्नेचर यांसारख्या नामांकित डॉग फूड कंपन्यांनी या उपक्रमाला सहकार्य केले..अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि एसी ट्रॅक्टरची भुरळया प्रदर्शनात पंजाबमधील अत्याधुनिक मळणी यंत्रे आणि स्वयंचलित मुरघास निर्मिती करणारी यंत्रे ठेवण्यात आली आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या कडाक्यापासून शेतकऱ्यांचा बचाव करणारा ‘जॉन डिअर’ कंपनीचा एसी केबिन असलेला ट्रॅक्टर पाहण्यासाठी तरुण शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. मजूर टंचाईवर उपाय म्हणून मुरघास यंत्रांकडे शेतकरी स्वयंरोजगाराचे साधन म्हणून पाहत आहेत. त्याशिवाय गुलाब स्पर्धा येथे आयोजिण्यात आली रोज क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने आयोजित या स्पर्धेत ५० हून अधिक रंगांच्या आणि छटांच्या गुलाबांनी शहरवासीयांना भुरळ घातली आहे. सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनातील या वैविध्यामुळे सोलापूरसह सांगली, पुणे, धाराशिव आणि शेजारच्या कर्नाटकातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत..Caravan Dog: कारवान श्वानाची विदेशी पशुपालकांनाही भुरळ.‘सोन्या’वेधतोय लक्षयाच कृषी प्रदर्शनात सध्या ‘सोन्या’ नावाचा खोंड आणि अत्याधुनिक शेती यंत्रसामग्री आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. कडलास (ता. सांगोला) येथील विठ्ठल पवार यांचा हा काजळी खिलार जातीचा खोंड पाहण्यासाठी पशुपालकांनी मोठी गर्दी केली आहे. सोन्या खोंडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने आतापर्यंत देशभरातील विविध प्रदर्शनांमध्ये ११ वेळा ‘हिंद केसरी चॅम्पियन’ होण्याचा मान मिळवला आहे..साडेतीन वर्षे वय आणि सहा दाती असलेल्या या खोंडाची उंची साडेसहा फूट आहे. सोन्याचा शाही आहार आणि निगा: पशुपालक विठ्ठल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या देखण्या शरीरासाठी त्याच्या आहारावर विशेष लक्ष दिले जाते. रोजच्या आहारात साधारण रोज १० अंडी, ५ लिटर दूध, शेंगदाणा पेंड, मका भरडा (साधारण अडीच किलो) त्याला लागतो. दर दोन दिवसांनी स्वच्छता केली जाते. अंगावर डाग पडू नयेत म्हणून त्याला गादीऐवजी (मॅट) उसाच्या पाचटावर बसवले जाते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.