Yavatmal News : पाणंद रस्त्याबाबत सरकारकडून किती ही दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतरस्त्यांची परिस्थिती सुधारली नाही हे वास्तव आहे. शासनाच्या याच दुर्लक्षित धोरणाचा फटका बसत चिखलमय पाणंद रस्त्यावर केळीचा ट्रॅक्टर फसल्याने मोरथ (ता. महागाव) येथील शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. .महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पांदणरस्त्यांच्या सुधारणांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. शेतरस्ते मोकळे करण्यात वाद उद्भवल्यास प्रसंगी पोलिस संरक्षण देणार असल्याचे ते सातत्याने सांगतात. महसूल व शेतकऱ्यांमध्ये सुसंवाद घडत फेरफारसह इतर विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लागावीत याकरिता महसूल पंधरवाडा देखील जाहीर करण्यात आला आहे..मात्र प्रत्यक्ष स्थिती यापेक्षा वेगळीच आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव मोरथ (ता. महागाव) येथील समीर चक्करवार यांनी घेतला आहे. श्री. चक्करवार हे प्रयोगशील शेतकरी असून त्यांचे केळी लागवडीत सातत्य आहे. मात्र पावसाळ्यात शेतापर्यंतचा रस्ता चिखलमय होत असल्याने केळीची वाहतूक जोखमीची ठरते. .Farm Road : धाराशिवमध्ये ७२ किलोमीटरच्या ३७ रस्त्यांच्या सीमांकनाला वेग.त्यामुळेच या रस्त्यावर मुरुम टाकण्याची परवानगी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. याकरिता सातत्याने तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविण्यात आले. परंतु प्रशासनाने त्यांच्या या मागणीची कोणतीच दखल घेतली नाही. शासनाच्या योजनेतून या शेतरस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम व्हावे याकरीता त्यांनी प्रशासनाला साकडे घातले. त्याला सकारात्मक प्रतीसाद मिळाला नाही, असे समीर यांनी सांगीतले..Farm Road : कंपन्यांचा सीएसआर फंड शेतरस्त्यांसाठी सक्तीचा करा.ट्रॅक्टर फसला चिखलातसण, उत्सवाच्या काळात केळीला दर मिळेल या अपेक्षेने त्यांनी माल काढणीवर भर दिला आहे. काढणीनंतर बाजारापर्यंत माल नेत असताना सद्या सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झालेल्या चिखलात ट्रॅक्टर फसला. अनेक तासाच्या प्रयत्नानंतर ट्रॅक्टर चिखलातून काढण्यात यश आले असले तरी बाजारपेठेत पोहचण्याला उशीर झाला. परिणामी नुकसान सोसावे लागले, असे त्यांनी सांगितले..पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणार, त्याच्या दुरुस्तीची कामे होणार असा दावा महसूल मंत्री सातत्याने करतात. मात्र त्यांच्या अधिनस्त महसूल यंत्रणा शेतकऱ्यांना प्रतिसाद देत नाही. त्यामुळे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात फरक आहे. महसूल मंत्र्यांनी स्वतः पाणंद रस्त्याची पाहणी केली पाहिजे. तेव्हाच त्यांना खरी परिस्थिती कळेल.- समीर चक्करवार, शेतकरी, मोरथ, यवतमाळ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.