Agriculture Department: खरीप हंगामासाठी (२०२६-२७) आयोजित पीकस्पर्धेत मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची मुदत सोमवारपर्यंत (ता. १०) वाढविण्यात आली असून, शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे..कृषी विभागामार्फत राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खरीप पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदापासून प्रथमच स्वतंत्र ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाइन प्रक्रियेचे पहिले वर्ष असल्याने शेतकऱ्यांची सोय लक्षात घेऊन शासनाने मूग व उडीद पिकांसाठी एक वेळची विशेष बाब म्हणून मुदतवाढ दिली आहे..Kharif Crop Competition: मूग-उडीद पीकस्पर्धेचे शेवटचे तीन दिवस.या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११ पिकांचा समावेश आहे. सहभागी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे व संबंधित पीक किमान ४० आर क्षेत्रावर सलग घेतलेले असणे आवश्यक आहे..Kharif Crop Competition 2026: ‘खरीप हंगाम २०२६ पीकस्पर्धेत सहभागी व्हा’.अर्जासाठी फार्मर आयडी, प्रवेश शुल्काची पावती, आदिवासी गटासाठी जात प्रमाणपत्र आणि बँक खाते तपशील आवश्यक आहेत. सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये, तर आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांची निवड तालुका स्तरावरील उत्पादनाच्या आधारे करण्यात येणार असून, जिल्हा व राज्यस्तरावरही गौरव केला जाणार आहे..राज्यस्तरीय प्रथम विजेत्यास ५० हजार, द्वितीय ४० हजार आणि तृतीय क्रमांकासाठी ३० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. मूग व उडीद वगळता इतर खरीप पिकांसाठी अर्जाची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे. संकेतस्थळावरील पीकस्पर्धा टॅबद्वारे अर्ज करावेत, असे आवाहन डाबरे यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.