Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदाची बाजारात आवक सुरू झाली आहे. लवकरच कापूस, सोयाबीनचीही आवक सुरू होईल. त्यामुळे शासनाने सरकारी खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन केली आहे..शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, शेतकरी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे, तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, कोमल वानखेडे, आशा महांकाळे, शीतल पोकळे, सुनंदा चोरमल, मंदा गमे, पुष्पा घोगरे, सुनीता अमोलीक, युवा आघाडीचे अध्यक्ष मयूर भनगडे, मधू काकड, अशोक आव्हाड, श्रीराम त्रिवेदी, बाळासाहेब घोगरे, भरत गलांडे, विष्णू भनगडे, अर्जुन दातीर, जगदीश खरात, बाबासाहेब गायकवाड, अंबादास गमे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषिमंत्र्यांना निवेदन दिले आहे. .MSP Procurement: हमीभाव खरेदी प्रक्रिया जलद राबवा: मंत्री रावल.त्यात म्हटले आहे, की बाजारात खरिपातील मूग, उडदाची आवक सुरू झाली आहे. लवकरच कापूस, सोयाबीनचीही आवक सुरू होईल. त्यामुळे शासनाने सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. केंद्राने कापसाची शुल्कमुक्त आयात, सोया पेंड, सोयाबीन तेल आयतीचे पुढील पाच वर्षांचे करार, मका, तुरीची अनावश्यक आयात करून शेतीमालाचे भाव पाडण्याचे धोरण राबविले आहे..खरीप हंगामची पीक काढणी पुढील महिन्यात सुरू होईल परंतु कापूस, सोयाबीन, मका, तूर पिकांची शासनाने आयात केल्यामुळे या खरीप हंगामात पिकांना बाजारात उत्पादन खर्च भरून निघेल इतकाही भाव मिळणार नाही. .Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीत अनियमितता.शासनाचेच शेतकरी विरोधी आयात निर्यात धोरणामुळे वरील पिकांना बाजारात शासनाने जाहीर केलेल्या कमाल आधारभूत किमतीपेक्षा खूपच कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. .कांद्याला शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे उत्पादन खर्चही मिळत नाही. त्यामुळे कांद्याला परवडेल असा दर द्यावा. कांदा उत्पादकांना प्रति एकरी ३० हजार रुपये अनुदान द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.