Agricultural Management: आगामी मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्ह्यांनी पूर प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य सेवा, अखंड वीजपुरवठा, शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते दुरुस्ती तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिले. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे टंचाईजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नियोजनबद्ध उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या..विधान भवन येथे मंगळवारी (ता. १९) दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित मॉन्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकांचे अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम उपस्थित होत्या..Agriculture Irrigation Management: सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आराखडा तयार करा.द्विवेदी म्हणाल्या, की मॉन्सून काळात पाणी साचणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात. नालेसफाईची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील दरडप्रवण भागांतील नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतराचे नियोजन तयार ठेवावे..पूरस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठ व नाल्यालगत राहणाऱ्या कुटुंबांसाठी निश्चित केलेल्या निवारा केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पावसाळ्यात जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व जिल्ह्यांत पुरेसा औषधसाठा व लसी उपलब्ध ठेवाव्यात. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी पिण्याच्या पाण्याचे नमुने नियमित तपासावेत तसेच क्लोरीनसह आवश्यक शुद्धीकरण प्रक्रिया राबवाव्यात, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या..Monsoon Preparation: आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा: विभागीय आयुक्त जी. श्रीकांत.बैठकीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्यांची तयारी, जिल्हास्तरावरील ‘आपत्ती मित्र’ प्रशिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या जीवरक्षक जॅकेट, बॅटऱ्या, दोरखंड आणि बोटींचाही आढावा घेण्यात आला..पूरनियंत्रण समन्वयाबाबतही चर्चासांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आलमट्टी धरणाच्या पूरनियंत्रण समन्वयासंदर्भात राज्याच्या जलसंपदा विभागाने कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत केलेल्या बैठकीची माहितीही या वेळी सादर करण्यात आली. तसेच, पुढील काळातील समन्वय व नियोजनावर चर्चा झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.