Solapur News: कोण किती जवळचा? यापेक्षा इलेक्टिव्ह मेरिट पाहून भाजपने ऐनवेळी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी अनेक ठिकाणी धक्कादायक उमेदवारी दिली आहे. उमेदवारीत कट बसला जाण्याची शक्यता गृहीत धरून असलेल्या अनेकांनी शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. .दाखल झालेल्या अर्जांची छाननी झाली असून, उमेदवारी मागे घेण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (ता. २७) अर्ज माघारीचा शेवट दिवस आहे. रविवारी आणि सोमवारी (ता. २६) आलेली सार्वजनिक सुट्टी इच्छुकांच्या मनधरणीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे दिसते..ZP Election: अतिरिक्त यंत्रांची व्यवस्था.जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी तब्बल ९४५ तर ११ तालुका पंचायत समितीच्या १३६ गणांसाठी १६५९ एवढे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून, आजपासून अर्ज माघारीला सुरुवात झाली आहे. अर्ज माघारीसाठी मंगळवारपर्यंत मुदत असली तरीही रविवारी आणि सोमवारी सुट्टी आल्याने माघारीसाठी शनिवार व मंगळवार असे दोनच दिवस मिळणार आहे..या दोन दिवसांत जे अर्ज काढणार नाहीत. त्यांची मनधरणी करण्यासाठी रविवार व सोमवार हे दोन दिवस असणार आहेत. मंगळवारी (ता. २७) दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सर्वाधिक ताल हा भाजपचा दिसत आहे..भाजपकडे सर्वाधिक आमदार, सोलापूरचे पालकमंत्रिपद, राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने भाजपच्या उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात चुरस दिसली. त्यामुळे भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरांचे प्रमाण आहे. भाजपमधील बंडखोरील कशी रोखली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..Local Body Elections: मिनी मंत्रालयात घराणेशाहीचा खुंटा.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका म्हणजे विद्यमान आमदारांची घटक चाचणी परीक्षाच मानली जात आहे. या परीक्षेला जिल्ह्यातील आमदार कसे सामोरे जातात? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध लढण्यासाठी काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाल्याचे दिसत आहे..इच्छुकांना ‘स्वीकृत’चे गाजर...काही महिन्यांपूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत प्रत्येक पाच सदस्य व सर्व तालुका पंचायत समित्यांमध्ये प्रत्येकी दोन सदस्यांना स्वीकृत करण्याबाबतचा मजकूर या पत्रात होता. भाजपमधील दोन प्रमुख नेत्यांमधील हा पत्रव्यवहार म्हणजे येत्या काळात स्वीकृत सदस्य नक्की होतील, अशी खात्री व्यक्त केली जात आहे. अनेक बंडखोरांना पक्षासोबत टिकवून ठेवण्यासाठी स्वीकृत सदस्याचे गाजर अधिक पॉवरफुल्ल ठरत असल्याचे दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.