Jalgaon News: येथील कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या (सीसीआय) केंद्राचा प्रारंभ झाला असला तरी कापसातील आर्द्रता जास्त असल्याने या केंद्रावर केवळ दोनच ट्रॅक्टर कापूस खरेदी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, या संदर्भात बाजार समितीच्या सभापतींसह संचालकांनी मध्यस्थी करुन मार्ग काढला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांनी आणलेला कापूस जीनमध्येच सुकवून तो खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. .येथील बाजार समितीला ‘सीसीआय’ केंद्र मंजूर झाल्यानंतर त्याचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ, मंत्री अनिल पाटील, बाजार समितीचे संचालक अशोक पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. पहिल्या टप्प्यात दहा ट्रॅक्टर कापूस या केंद्रावर विक्रीसाठी आला. मात्र, कापसाची गुणवत्ता नसल्याने तसेच त्यात आर्द्रता जास्त असल्याने दोन ट्रॅक्टर वगळता इतर शेतकऱ्यांचा कापूस नाकारण्यात आला. १५ क्विंटल ९० किलो कापूस मोजला गेला. शेतकरी सकाळपासून केंद्रावर उपाशीपोटी येऊन बसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली..CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ची १४ हजार ३७४ क्विंटल कापूस खरेदी.पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी‘सीसीआय’चे अधिकारी योगेश राजपूत थाळनेरकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी कैफीयत मांडल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत शेतकऱ्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. त्यामुळे केंद्रावर आलेले सर्व शेतकरी चिडले. त्यामुळे दुपारी चारपर्यंत एकही ट्रॅक्टर मोजण्यात आलेले नव्हते. सकाळपासून शेतकरी या ठिकाणी थांबून होते..CCI Rules: ‘सीसीआय’च्या जाचक अटींनी कापूस उत्पादकांची वाढली डोकेदुखी .या प्रकाराबद्दल काही शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना कळविल्यानंतर ‘सीसीआय’ केंद्रावर येण्यास ते तयार नव्हते. अखेर सभापती अशोक पाटील, संचालक प्रा. सुभाष पाटील व भोजमल पाटील यांनी लामा जीनमध्ये येऊन परिस्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर काही शेतकऱ्यांचा कापूस गुणवत्ता नसलेला असल्याचे लक्षात आले. शिवाय कापसाला १६ च्यावर आर्द्रता होती. ‘सीसीआय’च्या नियमाप्रमाणे कापसात केवळ ८ ते १२ टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे. अखेर संचालकांनी जास्त आर्द्रता असलेला कापूस जीनमध्येच सुकवावा आणि त्यानंतर तो मोजून घ्यावा, असा सर्वानुमते निर्णय घेतला. सुकवलेला कापूस मोजण्यास आम्ही तयार असल्याचे ‘सीसीआय’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले..शेतकऱ्यांनी ‘स्लॉट’ मंजूर झाल्यावरच ट्रॅक्टर आणावे. शक्यतो आर्द्रता कमी असलेला आणि गुणवत्ता असलेला कापूस आणावा. म्हणजे खरेदीसाठी अडचणी येणार नाहीत.- अशोक पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.