Solapur News: सीना- कोळेगाव, खासापुरी व चांदणी या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सीना नदीत सोडण्यात येत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. या नदीवरील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. सुमारे पावणेदोनशे लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे..गेल्या दोन दिवसांपासून थांबलेला पाऊस सोमवारी (ता.२२) पुन्हा सुरू झाला. सोमवारी सकाळी मोहोळ, बार्शी, माढा भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपर्यंत तो थांबून-थांबून बरसत होता. त्यातच अहिल्यानगर, धाराशीव जिल्ह्यात सतत पाऊस होत असल्याने तिकडील अतिरिक्त पाणी सीनानदीत सोडण्यात येत आहे..Maharashtra Heavy Rain: राज्यात पावसामुळे खरिपाची दाणादाण.त्यामुळे सीनानदीला पूरस्थिती गंभीर झाली आहे. सोमवारी दुपारपर्यंत चांदणी प्रकल्पातून ४८ हजार ५९१ क्युसेक, खासापुरीतून ७८ हजार ८६७ क्युसेक आणि सीना-कोळेगाव प्रकल्पातून ४६ हजार ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते, असा एकूण १ लाख ७३ हजार ७५८ क्युसेकचा विसर्ग नदीत मिसळत आहे..या पाण्यामुळेच माढा, मोहोळ तालुक्यांना फटका बसला आहे. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव, मलिकपेठ, आष्टे, घाटणे, बोपले, पीरटाकळी, शिंगोली या गावांतील पावणेदोनशे नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच बोपले, मलिकपेठ, आष्टे- कोळेगाव, शिरापूर, मुंडेवाडी, देगाव, डिकसळ, भोयरे, शिंगोली- तरटगाव हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद पडले आहेत..Heavy Rain In Marathawada : मराठवाड्यात पावसाचा कहर; शेती पिकं गेली पाण्याखाली, तातडीने मदतीची अपेक्षा.स्थानिक प्रशासनाने बचावकार्याला प्राधान्य देत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. सीना नदीच्या पुढील प्रवाहावर लक्ष ठेवण्यात येत असून, येत्या काही तासांत पावसाचा अंदाज अधिक वाढल्यास पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने नागरीकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे..भोगावती-नागझरी नदीही दुथडीसीना नदीला एकीकडे पूरस्थिती गंभीर झाली असताना, आता बार्शी तालुक्यातून वाहणारी भोगावती नदीही दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांनाही पुराचा धोका निर्माण झाला आहे. बार्शी तालुक्यातील हिंगणी, पानगाव, काळेगाव, इर्ले, ढोराळे, यावली, तडवळे आणि मोहोळ तालुक्यातील वाळूज, देगाव, नरखेड या भागात परिस्थिती गंभीर झाली आहे. .त्याशिवाय बार्शीतून वाहणाऱ्या नागझरी नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या नदीकाठच्या हत्तीज, सासुरे, राळेरास, दहिटणे, मुंगशी या गावांनाही फटका बसला आहे. वाळूज आणि देगाव परिसरांत अनेक शेतकऱ्यांची जनावरे शेतातील वस्त्यांवर अडकली आहेत. काही कुटुंबांना ही सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.