डॉ. शार्लेट रॉड्रिक्स, डॉ. गौरी रेळे, डॉ. कैवल्य देशमुखपूर्वीच्या काळात आजारी किंवा जखमी प्राण्यांना उपचारांसाठी दूरच्या दवाखान्यात घेऊन जाणे हे शेतकऱ्यांसाठी वेळखाऊ आणि खर्चीक काम होते. आता मात्र आधुनिक उपकरणांनी सज्ज अशा मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका ग्रामीण भागात त्वरित पोहोचत असल्याने जनावरांना घटनास्थळीच प्राथमिक उपचार मिळू शकतात..महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका सेवा सुरू झाली. १९६२ या क्रमांकावर तक्रार नोंदवली जाते. पशुवैद्यक ठरलेल्या वेळेत थेट शेतकऱ्यांच्या गावात पोहोचतात. ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी ही सेवा खरोखरच जीवनदायी ठरत आहे. अपघात, आजारपण किंवा प्रसूतीसारख्या तातडीच्या प्रसंगांत प्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी उपलब्ध असलेली मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका सेवा आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे..Animal Health Care : दुधाळ जनावरांसाठी खनिज मिश्रणाचे महत्त्व .पूर्वीच्या काळात आजारी किंवा जखमी प्राण्यांना उपचारांसाठी दूरच्या दवाखान्यात घेऊन जाणे हे शेतकऱ्यांसाठी वेळखाऊ आणि खर्चीक काम होते. प्रवासादरम्यान उपचार न मिळाल्याने अनेकदा प्राण्यांच्या आरोग्याची अवस्था अधिक बिघडत असे. आज मात्र आधुनिक उपकरणांनी सज्ज अशा मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका ग्रामीण भागात त्वरित पोहोचत असल्याने जनावरांना घटनास्थळीच प्राथमिक उपचार मिळतात. त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता अधिक वाढते..मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिकाप्रशिक्षित पशुवैद्यक व सहायक कर्मचारी.उपचारासाठी औषधे.जखमांवर उपचारासाठी आवश्यक सामग्री.सलाइन सुविधा, कॅल्शिअम व ऊर्जा पूरक इंजेक्शन्स.प्रसूतीसाठी पूर्ण ओटी किट.दुधातील सब-क्लिनिकल मस्टायटीस तपासणी किट..Animal Health Care : पावसाळ्यात गायी, म्हशी आजारी पडू नयेत म्हणून काय करावे?.सुविधांचा फायदामोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिकेमध्ये असलेल्या सुविधांच्यामुळे गंभीर जखमा, प्रसूतीतील अडचणी, विषबाधा, पोटफुगी, तीव्र संक्रमण, सांधे-हाडांच्या दुखापती अशा अनेक समस्यांवर तात्काळ उपचार शक्य होतात..पशुवैद्यक गावात येत असल्याने लसीकरण, कृमी नियंत्रण, उष्णता व्यवस्थापन, प्रजनन व्यवस्थापन, तसेच संतुलित आहाराबाबत शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळते.भविष्यात या सेवेला आणखी सक्षम करण्यासाठी टेलिमेडिसिन, जीपीएस-आधारित लोकेशन ट्रॅकिंग, ड्रोनद्वारे औषध पोहोचवणे, फील्ड डायग्नॉस्टिक किट्स, तसेच विविध तज्ज्ञ पशुवैद्यकांची उपलब्धता वाढवण्याची गरज आहे..यामुळे अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक उपचार ग्रामीण पातळीवर करता येतील.मोबाइल पशुवैद्यकीय रुग्णवाहिका ही केवळ आपत्कालीन सेवा नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणारे एक प्रभावी साधन आहे.- डॉ. कैवल्य देशमुख ९४२१३८०४७३(सहायक प्राध्यापक, परिक्रमा व्हेटर्नरी सायन्स कॉलेज, काष्टी, अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.