Utility Services: डहाणू तालुक्यातील कासा, सायवन, चारोटी, गडचिंचले परिसरात मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे सिलिंडर अधिकृत करता येत नाही. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना स्वयंपाकाचा गॅस मिळवण्यासाठी अडचणी उद्बवत आहे. .डहाणू तालुक्यातील विविध गावांसाठी सिलिंडर वाहतुकीसाठी ठराविक वार निश्चित करण्यात आले आहेत. निर्धारित दिवशी संबंधित भागात गॅस वितरण केले जाते. मात्र, ऑनलाइन बुकिंग, ओटीपी पडताळणी प्रणालीत अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने ओटीपी मिळत नसल्याने मुदतीच्या काळात गॅस वितरण होत नसल्याने वेळ, वाहन खर्च, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे..Fuel Stock Solapur: इंधनाचा मुबलक साठा; पुरवठा सुरळीत ठेवा: जिल्हाधिकारी.मोबाईल नेटवर्कमध्ये अडचणीग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्मार्टफोन नाहीत. काही ठिकाणी मोबाईल असला तरी नेटवर्क नसल्याने संदेश प्राप्त होत नाहीत. अनेक कुटुंबांमध्ये मोबाईलधारक व्यक्ती रोजगारासाठी बाहेर गेलेली असल्याने घरातील महिलांना ओटीपी मिळवता येत नाही..Fuel Stock Solapur: इंधनाचा मुबलक साठा; पुरवठा सुरळीत ठेवा: जिल्हाधिकारी.वितरण केंद्राची मागणीनव्या प्रणालीचा फटका केवळ ग्राहकांनाच नव्हे तर गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांनाही बसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती लक्षात घेऊन पूर्वीप्रमाणे पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे..कासा, चारोटीतील दुर्गम भागात सिलिंडर वितरण केंद्र नाही. डहाणू येथून चाळीस किलोमीटरवरून वाहनाने येथे सिलिंडर आणावे लागतात. त्यामुळे चारोटी, कासा या भागात वितरण केंद्राची मागणी होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.