राज्यातील अनेक भागात विशेषतः पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये बिबट्यांची मोठी दहशतजुन्नरचे आमदार शरद सोनवणे बिबट्याच्या वेशात विधानभवनात दाखलदोन रेस्क्यू सेंटर बनवण्याची मागणीविभागात तीन महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यात ५५ बळी.Leopard Attack Maharashtra: राज्यातील अनेक भागात विशेषतः पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये बिबट्यांची मोठी दहशत आहे. कधीही हल्ले होत आहेत. माणसं मरत आहे, मुले मरत आहेत. शेतीही उजाड झाली आहे. कोणताही शेतकरी शेतीत काम करायला तयार नाही, असे सांगत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दोन रेस्क्यू सेंटर बनवण्याची मागणी केली. ते आज बुधवारी (दि.१० डिसेंबर) बिबट्याच्या वेशात विधानभवन परिसरात दाखल झाले. बिबट्याच्या दहशतीप्रश्नी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला..माझ्या विभागात तीन महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यात ५५ बळी गेले होते. २०१४-१५ च्या अधिवेशनात हा धोका मी शासनाला सांगितला होता. हा मांजर कुळातील प्राणी शेड्यूल एकचा नसून शेड्यूल दोनचा आहे. जेणेकरुन त्याला पकडता येईल अथवा त्याचा बंदोबस्त करता येईल. पण त्यावेळी कोणी काही मनावर घेतले नाही. २०१४ ते २०२४ दरम्यान वन अधिकाऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. पण त्याला यश आले नाही. आमच्या माता- भगिनी आज शेतात जाऊ शकत नाही. मुले शाळेत जाऊ शकत नाही. ऊस पट्ट्यात हजारोंच्या माणूस मेल्यावर २५ लाख दिले जातात. माणसाची किंमत २५ लाख होऊ शकत नाही. आम्हाला पैसा नको. तर शासनाने या समस्येची स्वेच्छा दखल घेऊन दोन रेस्क्यू सेंटर बनवावेत. एक जुन्नर आणि अहिल्यानगरमध्ये हे सेंटर असावे. बिबट्याचा विषय खूप गंभीर आहे. सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. .Leopard Control: बिबट्यांसाठी जंगलात शेळ्या सोडू : गणेश नाईक.बिबट्याचे मानवावरील हल्ले ही राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत एकही बळी जात असेल तरी त्यासाठी सरकार जबाबदार आहे, असेही सोनवणे म्हणाले..Leopard Alert: बिबट्याने उडवली झोप.जंगलातील बिबट्या आता मानवी वस्तीत घुसला आहे. ते हजारोंच्या संख्येने वाढले आहेत. एकही बिबट्या जंगलात राहत नाही. तो आमच्या उसात राहतो. आमच्या घरांजवळ राहतो. पण या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आतापर्यंत केवळ टिंगल्या, मस्करी चालल्या होता, अशी टीका त्यांनी केली. नव्वद दिवसांत एकही बिबट्या महाराष्ट्रात फिरणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी. हा राज्य पातळीचा विषय आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.