Field Review : विधिमंडळाच्या आमदारांची समिती अहिल्यानगर जिल्ह्यात ६ ते ८ आॅगस्ट दरम्यान तीन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. या समितीमध्ये २७ आमदारांचा समावेश असून समितीचे सदस्य शासकीय विभागांनी जिल्ह्यात राबवलेले प्रकल्प, योजनांची तपासणी व प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियोजनासाठीची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान जलजीवन पाणी योजनेतून गैरव्यवहाराबाबत समितीची काय भूमिका असेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..शासकीय विभागांनी जिल्ह्यात राबवलेले प्रकल्प, योजनांची तपासणी व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात समिती येत आहे. या समितीमध्ये प्रमुख अर्जुन खोतकर असून, विधानसभेचे २१ आमदार आणि विधान परिषदेच्या ५ आमदारांचा समावेश आहे. तसेच सचिवालयातील १० अधिकारी व कर्मचारी आणि त्यांचे स्वीय सहायक असे सुमारे ५० जणांच्या पथकाचा समावेश आहे. .Water Resource Department: जलसंपदा विभागाचा विरोध नेमका कोणाला?.सदस्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासाची आणि भेटीच्या नियोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासन करण्यात व्यस्त आहे. पूर्वी हा दौरा २० ते २२ जुलै दरम्यान निश्चित झाला होता. मात्र तो पुढे ढकलण्यात आला. आता हा दौरा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होत आहे. .Water Management Challenges: गाव ते नदी : जबाबदारी कोणाची?.समितीच्या दौऱ्यानुसार महसूल, भूसंपादन, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, वैद्यकीय शिक्षण, उद्योग, ऊर्जा कामगार व खणी कर्म, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, नगर विकास, कृषी, ग्रामविकास, गृह, राज्य उत्पादन शुल्क, नियोजन, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, पर्यटन व सांस्कृतिक कार्य, सहकार, पणन, उच्च व तंत्र शिक्षण, मृद व जलसंधारण, शालेय शिक्षण व क्रीडा, जलसंपदा या विभागांच्या कामांची, योजनांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत..जलजीवनबाबत काय भूमिका असेलअहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवनच्या पाणीपुरवठा योजनेत मोठा गैरव्यवहार झाला. मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांच्या तक्रारीनुसार चौकशी करून जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मिळून दहा अभियंते निलंबित झाले. या योजनेच्या गैरव्यवहारात सहभागी असलेले अजून अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यावर कारवाई नाही. त्यामुळे शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांची तपासणी करण्यासाठी येत असलेल्या समितीची जलजीवनबाबत काय भूमिका असेल याकडे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.