Latur News : अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निवारण दलाच्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येते. मात्र, ही मदत पुरेशी ठरत नाही. यामुळे औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे त्यांच्या औसा विधानसभा मतदारसंघातील पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांना सरकारच्या बरोबरीने मदत करणार आहेत..यात मृत व्यक्ती, जनावरे व कोंबड्यांसह घरात पाणी शिरल्यामुळे झालेले नुकसान व घरांच्या पडझडीपोटी ९० लाख रुपयाची मदत देणार आहेत. तेराशे कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. येत्या दिवाळीपूर्वी ही मदत आपत्तीग्रस्तांना मिळणार असून क्रिएटिव्ह आणि अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून या मदतीचे कृषीरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार पवार यांनी दिली..Maharashtra Flood Relief Package: अतिवृष्टिग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटी.ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे मतदारसंघात जनजीवन विस्कळित झाले. पिकांचे मोठे नुकसान झाले. घरात पाणी शिरून साहित्याचे तर पडझडीने घरांचे नुकसान झाले. जनावरांचे मृत्यू आणि काहींचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी भरून न येणारे नुकसान झाले आहे. या स्थितीत राज्य सरकारकडून भरपाई देण्यात येत असून ही भरपाई नुकसानीच्या तुलनेत पुरेशी ठरत नाही. यामुळे क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून मतदारसंघातील आपत्तीग्रस्तांना सरकारच्या बरोबरीने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. .सरकारकडून जेवढी भरपाई मंजूर होईल, तेवढीच रक्कम मदत म्हणून दोन्ही फाउंडेशनच्या वतीने दिली जाणार आहे. अतिवृष्टी व पुरात जीव गमावलेल्यांच्या वारसांना सरकारकडून चार व फाऊंडेशनकडून चार लाख अशी प्रत्येकी आठ लाख रुपये मिळणार आहेत. बैल दगावलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या ३२ हजार रुपये तर गाय व म्हैस दगावल्यास ३७ हजार पाचशेएवढीच मदत आमदार पवार यांच्या पुढाकाराने दिली जाणार आहे. .Flood Relief Package: ‘पॅकेज’चा फोलपणा.वासरू, शेळी, कोंबड्या, घर पडणे किंवा घरात पाणी घुसणे अशा सर्व प्रकारच्या नुकसानीसाठी सरकार जेवढी भरपाई देईल, तेवढीच भरपाई देण्यात येणार आहे. एक हजार २७६ कुटुंबांना या मदतीचा लाभ होणार आहे. दिवाळीपूर्वी औसा विजय मंगल कार्यालयात एका कार्यक्रमातून ही मदत व फूड पॅकेट्सचे वितरण करण्यात येणार आहे. ही मदत पंचनाम्यावर आधारित असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात येणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.....अशी मिळणार मदततीन मयत व्यक्ती - प्रत्येकी चार हजार - बारा लाख वीस हजार रुपये२५ मयत म्हैस - प्रत्येकी ३७ हजार पाचशे - नऊ लाख ३७ हजार पाचशे रुपये१४ मयत गायी - प्रत्येकी ३७ हजार पाचशे - पाच लाख २५ हजार रुपयेसहा मयत बैल - प्रत्येकी ३२ हजार - एक लाख ९२ हजार रुपये१० मयत वासरे - प्रत्येकी वीस हजार - दोन लाख रुपयेनऊ मयत शेळी - प्रत्येकी चार हजार - ३६ हजार रुपये१५८ कोंबड्या - प्रत्येकी शंभर रुपये - १५ हजार आठशे रुपये२७० घरात पाणी शिरलेले कुटुंब - प्रत्येकी दहा हजार - २७ लाखरुपये७८१ घरांची पडझड - प्रत्येकी चार हजार - ३१ लाख २४ हजार रुपयेएकूण लाभार्थी - एक हजार २७६एकूण मदत - ८९ लाख ३० हजार तीनशे रुपये.या उपक्रमातून लाभार्थींना ज्या कारणांसाठी मदत मिळाली आहे, त्याच कारणांसाठी त्याचा उपयोग व विनियोग करावा. बैल दगावला असेल, तर मदतीतून पुन्हा बैलच खरेदी करावा. गाय किंवा म्हैस दगावली असेल तर या मदतीतून पुन्हा खरेदी करावी. पडझडीसाठी मदत मिळाली असेल तर तिचा घराच्या दुरुस्तीसाठी वापर करावा. ज्या कारणांसाठी मदत त्याच कारणांसाठी त्याचा उपयोग करणे, हाच माणुसकीचा खरा अर्थ आहे. पीक आणि जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी वाढीव नुकसान भरपाई मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.- अभिमन्यू पवार, आमदार, औसा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.