Solapur News: महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाच्या विनियोगात २१ साखर कारखान्यांनी उल्लंघन केले आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगमनच्या (एनसीडीसी) अधिकाऱ्यांच्या पाहणीत ही बाब समोर आली आहे..याचे उल्लंघन केलेल्या सहकारी साखर कारखान्यांबाबत कारवाईची शासनास शिफारस करण्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे..Crop Loan: गडबडगुंडा पीककर्जाचा!.सहकारी साखर कारखान्यांना बळकटी देण्यासाठी अनुदान या योजनेतून राज्यातील ३२ सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भांडवलाची/मार्जिन मनी दिले. राज्य शासनामार्फत कारखान्यांना ४ हजार ३५५ कोटी रुपयांचे कर्ज दिले. या कर्जाच्या वापराचे निरीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या (एनसीडीसी) अधिकाऱ्यांनी जून-जुलैमध्ये ३० सहकारी साखर कारखान्यांना क्षेत्रीय भेटी दिल्या आहेत..Sugar Industry Crisis: सहकारी साखर कारखान्यांना घरघर.त्यापैकी २१ सहकारी साखर कारखान्यांकडून कर्जाच्या वापरात गंभीर स्वरूपाचे उल्लंघन आढळले. तर ३ साखर कारखान्यांनी कर्जाच्या वापरात काही प्रमाणात उल्लंघन केल्याचे व उर्वरित ६ साखर कारखान्यांनी कर्जाच्या अटी शर्तीनुसार कर्ज रक्कमेचा विनियोग केल्याचे आढळले आहे..समिती करणार शासनास शिफारसया समितीत संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) हे सदस्य तर साखर आयुक्तालयातील संचालक (अर्थ) या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. एनसीडीसीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये त्यांना कर्जाच्या विनियोगात गैरवापर केल्याचे आढळून आलेल्या साखर कारखान्यांविरुद्ध करावयाच्या कारवाईची शासनास शिफारस ही समिती करणार आहे. या समितीला अहवाल देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.