Nagpur News: सीलबंद पॅकमधून विक्री करण्यात आलेले कीटकनाशक नंतर तपासणीत ‘मिसब्रँडेड’ आढळले, तरी केवळ विक्रेते किंवा मार्केटिंग कंपनी यांना जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब-हरयाना उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा प्रकरणांत दोष सिद्ध करण्यासाठी विक्रेत्यांना संबंधित उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत माहिती होती किंवा त्यांनी पॅकिंग-लेबलिंगमध्ये हस्तक्षेप केला, याचे ठोस पुरावे सादर करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले..न्यायमूर्ती यशवीर सिंग राठोर यांनी मेसर्स सुमिनोवा ॲग्रो सायन्स आणि इतर विरुद्ध पंजाब राज्य या प्रकरणात हा निकाल दिला. या निर्णयामुळे देशभरातील कृषी निविष्ठा विक्रेते व मार्केटिंग कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील न्यायालयीन दाव्यानुसार, २२ मे २०१७ रोजी लुधियाना जिल्ह्यातील खन्ना येथील एका कृषी निविष्ठा दुकानातून कीटकनाशक निरीक्षकांनी ‘फिप्रोनील ०.३ टक्का जीआर’ या कीटकनाशकाचा नमुना घेतला..Pesticide Regulations: लेबलवर ‘पीएच’संदर्भातील सूचना देणे बंधनकारक .हे उत्पादन मेसर्स विकास ऑरगॅनिक इंडस्ट्री कॉर्पोरेशन, फरिदकोट यांनी उत्पादित केलेले व मेसर्स सुमिनोवा ॲग्री सायन्स, कोटकपुरा यांनी मार्केटिंग केलेले होते. नमुना मूळ सीलबंद पॅकमधून घेण्यात आला होता. चार दिवसांच्या विलंबानंतर नमुना राज्य कीटकनाशक प्रयोगशाळा, भटिंडा येथे पाठविण्यात आला. अहवालात हा नमुना ‘मिसब्रँडेड’ ठरविण्यात आला. त्यानंतर डीलरच्या मागणीनुसार दुसरा नमुना केंद्रीय कीटकनाशक प्रयोगशाळा, फरिदाबाद येथे पाठविण्यात आला. तेथेही नमुना ‘मिसब्रँडेड’ असल्याचा अहवाल आला..यानंतर २०१९ मध्ये डीलर, मार्केटिंग कंपनी व तिच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आणि उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले. मात्र उच्च न्यायालयात हे प्रकरण सुनावणीस आल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भातील फौजदारी तक्रार, समन्स आदेश व त्यानंतरची सर्व कार्यवाही रद्दबातल ठरवली..Pesticide Management Bill: कीडनाशक व्यवस्थापन विधेयकाचा मसुदा जारी.न्यायालयाचे निरीक्षणउच्च न्यायालयाने नमूद केले की, नमुना मूळ सीलबंद पॅकमधून घेतलेला असल्याने विक्रेते वा मार्केटिंग कंपनीचा गुणवत्तेशी थेट संबंध सिद्ध होत नाही. विक्रेते किंवा मार्केटिंग कंपनीने उत्पादन तयार करणे, लेबलिंग करणे किंवा घटक निश्चित करणे यामध्ये सहभाग असल्याचा कोणताही आरोप तक्रारीत नाही. कीटकनाशक कायदा, १९६८ च्या कलम ३३ अंतर्गत जबाबदारी निश्चित करण्यासाठी ‘जबाबदार अधिकारी’ म्हणून नामनिर्देशन आवश्यक आहे, जे या प्रकरणात नव्हते. केवळ ‘मिसब्रँडेड’ आढळले म्हणून विक्रेत्यांवर जबाबदारी लादता येणार नाही..शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळाव्या, या शासन उद्दिष्टानुसारच निविष्ठाविक्रेते आपले काम करतात. कंपन्यांच्या ‘मिस ब्रँडेड’ उत्पादनांशी त्यांचा कोणते संबंध नसतो, हे न्यायालयाच्या निर्णयावरून सिद्ध झाले आहे.मनमोहन कलंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष, ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.