Government Income: खेड तालुक्यात मागील आर्थिक वर्षात गौण खनिज वसुलीतून तब्बल १८ कोटी ८१ लाख ६९ हजार ४५१ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. वाळू, मुरूम आणि खडी यांसारख्या गौण खनिजांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असताना अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली..चालू वर्षात अवैध वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने मोहीम राबवत ६३ वाहनांवर कारवाई केली. त्यातून १ कोटी १५ लाख २७ हजार ९८५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच गौण खनिज उत्खनन व वाहतूक संदर्भातील ४२ प्रकरणांमध्ये सुमारे २७ कोटी रुपयांचा दंड अद्याप थकीत आहे..Revenue Department: अधिकाऱ्यांनी गावांत जाऊन समस्या सोडवाव्या: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे .या सर्व प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली असून दंड न भरणाऱ्या संबंधितांवर महसूल विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे. संबंधितांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्याची प्रक्रिया सुरू असून त्यापैकी १४ प्रकरणांचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे..Mineral Development Fund: दोन कोटी रुपयांचे निविष्ठा प्रकरण गाजणार विधिमंडळात .त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, ई-चावडी प्रणालीअंतर्गत शंभर टक्के महसूल वसुली पूर्ण करत खेड तालुक्याने पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. महसूल विभागाच्या कार्यक्षम नियोजनामुळे हा टप्पा गाठता आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले..अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. महसूल वाढीसोबतच नियमांचे काटेकोर पालन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.प्रशांत बेडसे, तहसीलदार, खेड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.