Raigad News : तालुक्यात टोरंट पॉवर कंपनीचा तीन हजार मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प मिनी माथेरान अशी ओळख असलेल्या ढाकमध्ये होणार आहे. या प्रकल्पासाठी २३३ हेक्टर जमिनीवरील वनसंपदा नष्ट होणार असल्याने पर्यावरणप्रेमी, शेतकरी तसेच स्थानिकामध्ये असंतोष आहे. .कर्जत तालुक्यातील ढाक परिसरात जलविद्युत प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाने जनसुनावणी घेतली. कोथल खलाटी, पोटल, साईडोंगर, अंबोट, ढाक, भालिवडी या गावांच्या हद्दीत पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात आहेत. प्रकल्पाला ३७७ हेक्टर जमीन आवश्यक असून २३३ हेक्टर वनजमीन आहे. .Matheran Traffic Issue : माथेरान होणार वाहतूक कोंडीतून मुक्त.एका बाजूला इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये विकासकामांना मनाई असताना टोरंट कंपनीसाठी वनविभागाचे नियम बाजूला ठेवल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. तसेच या प्रकल्पामुळे ढाक परिसराचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, एवढा मोठा वीज प्रकल्प होत असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांपासून लपवण्यात आली होती; मात्र जनसुनावणीच्या निमित्ताने प्रकल्पाची माहिती समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे. .विरोधाची कारणेढाक डोंगर परिसरात मिनी माथेरानचे स्वप्न दाखवण्यात आले होते. येथे पर्यावरणाचे संवर्धन करून पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाणार होते; मात्र वनविभागाच्या परवानग्यांअभावी प्रकल्प थांबवण्यात आला. मग जलविद्युत प्रकल्पाला परवानगी कशी दिली गेली, असा सवाल उपस्थित होत आहे..Matheran Landslide : भूस्खलनामुळे पर्यटकांना बंदी.जंगलतोडीमध्ये अनेक जुनी झाडे तोडली जाणार असल्याने ढाक परिसराचे नैसर्गिक सौंदर्यही नाहिसे होणार असल्याची भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर प्रकल्पासाठीचे डोंगर उत्खनन, मलबा, जमिनीची धूपमुळे पाण्याचा प्रवाह बदलून पिकांचे मोठे नुकसान होणार आहे..वन्यजीवांच्या अधिवासावर गदाप्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल होणार असून ढाक, भीमाशंकर जंगल परिसरातील वाघ, हरीण तसेच अनेक दुर्मिळ पशू-पक्ष्यांच्या अधिवासावर गदा येणार आहे. एवढेच नव्हे तर निसर्गाचा समतोल बिघडल्यास भविष्यात कर्जत तालुक्याला भीषण संकटांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.