Pune Agriculture: पुणे विभागात शेतकऱ्यांनी यंदा बाजरी पिकाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. विभागात आतापर्यंत सरासरीच्या एक लाख ६२ हजार ३९८ हेक्टरपैकी एक लाख २२ हजार ७६२ हेक्टर म्हणजेच ७६ टक्के पेरणी झाली असून सुमारे ३९ हजार ६३६ क्षेत्र या पिकापासून दूर राहिल्याची स्थिती आहे.