Maharashtra Dairy Farmers Facing Financial Losses: दुधाच्या खरेदी दरात महिन्यापासून एक रुपयाची घट झाली आहे. त्यामुळे दररोज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे २१ लाखांचा फटका बसत आहे. त्यातच पशुखाद्य, चाऱ्याचे दर वाढले असतानाही दूध दर कमी झाल्याने शेतकऱ्यांपुढे जनावरे सांभाळण्याचे आव्हानच उभे आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. .उन्हाचा कडाका वाढला आहे. टंचाईग्रस्त भागात जनावरांना विकत पाणी आणून जनावरांना द्यावे लागत आहे. त्याचा आर्थिक फटका बसत आहे. दूध उत्पादनातील घट, पाणीटंचाई, चारा, पशुखाद्याचे वाढले आहे. तर दूध दरात घट झाली आहे. सध्या सरकी ढेप बाजारात ३५०० ते ४२०० रुपये क्विंटलने मिळते..Milk Adulteration: भेसळीचा गोरखधंदा.२५०० रुपये क्विंटलने मिळणारा मका तीन हजार रुपये टन, ३५०० ते ४००० रुपयांनी मिळणारा ऊस पाच हजार रुपये टनाने घ्यावा लागत आहे. १५५० मिळणारी पेंडीचे पोते १६०० रुपयाला, १८०० रुपयाला मिळणारी सरकी पेंडीची गोणी १९०० ते १९५० रुपयांना मिळत आहे..Gokul Milk Rate : ‘‘गोकुळ’तर्फे म्हैस, गाय दूध खरेदी दरात एक रुपया वाढ’.कडबा, कडवळ चारा मिळणेही कठीण बनले आहे. त्यामुळे प्रतिलिटरला सुमारे ३५ ते ३८ रुपये खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातच दुधाचे दर एक रुपयांनी कमी झाल्याने सध्या गायीच्या दुधाला ३७ रुपये दर मिळतो. त्यामुळे उत्पादन खर्चातही शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे..जिल्हा दूध संकलन स्थितीसहकारी संस्थांचे संकलन८८ हजार ५०० लिटरखासगी संस्थांचे संकलन२० लाख दोन हजार ६०० लिटरमल्टीस्टेट संस्थेचे संकलन२३ हजार लिटरएकूण दुधाचे संकलन२१ लाख १४ हजार १०० लिटरदूध पावडरला दिले जाणारे दूधतीन लाख ८९ हजार ६०० लिटर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.