संदीप कान्हे, डॉ. अनुप्रिता जोशी, डॉ. राजेश क्षीरसागरदुधातील विविध घटकांचा स्वाद, पोषण, टिकवण क्षमता आणि प्रक्रिया सुलभता यावर प्रभाव टाकतात. दुधाच्या रासायनिक गुणधर्मांमुळेच दुग्ध प्रक्रिया उद्योगात विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी दुधाचा प्रकार आणि त्यातील रासायनिक घटक जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते, जेणेकरून उत्पादनाची गुणवत्ता, पोषणमूल्य आणि टिकाऊपणा सुनिश्चित करता येईल..दूध हे मानवाच्या आहारातील एक अत्यंत आवश्यक व पौष्टिक अन्नघटक आहे. दुग्ध प्रक्रिया ही एक सुसंगत व शास्त्रीय प्रक्रिया आहे. यामध्ये दूध संकलन, दर्जा तपासणी, गाळणी, तापविण्याची प्रक्रिया (उदा. उकळविणे, पाश्चरीकरण), थंड ठेवणे, घटकांचे विभाजन, पॅकिंग, साठवण व वितरण यांचा समावेश होतो. ही प्रक्रिया दूध टिकवण्यासाठी, त्यातील रोगकारक जंतूंना नष्ट करण्यासाठी, आणि ग्राहकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न पुरविण्यासाठी अत्यावश्यक ठरते..Milk Processing Equipment : दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे.दूध हा मानवी आहाराचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात मुख्यत्वे गाय आणि म्हशीचे दूध वापरले जाते, काही भागात शेळीचे दूध प्रचलित आहेत. गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असल्यामुळे ते लहान मुले, वृद्ध व्यक्तींना अधिक उपयुक्त ठरते. पचनास सुलभ असते. म्हशीच्या दुधात स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे पनीर, लोणी, दही निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त असते. शेळीचे दूध पचनासाठी हलके असते. काही अॅलर्जी असलेल्या लोकांसाठी ते अधिक फायदेशीर मानले जाते..दुधाचा रासायनिक घटक त्याच्या पोषणमुल्यांचा पाया आहे. दुधामध्ये सुमारे ८७ टक्के पाणी असते, जे द्रव रूपात शरीरात शोषणासाठी महत्त्वाचे आहे. दुधामध्ये सरासरी ३ ते ८ टक्के स्निग्ध पदार्थ असतात, जी शरीराला ऊर्जा प्रदान करतात. जीवनसत्त्व ‘अ’ व ‘ड’ च्या शोषणास मदत करते.दुधातील प्रथिने ही शरीराच्या उतींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात, विशेषतः त्यात केसिन नावाचे प्रथिन प्रमुख असते. दुधातील साखर (लॅक्टोज) शरीराला त्वरित ऊर्जा देते आणि खनिजद्रव्ये (सुमारे ०.७ टक्का) हाडे व दात मजबूत करण्यासाठी तसेच स्नायूंच्या कार्यासाठी आवश्यक असतात. दुधामधील जीवनसत्त्वे जसे की जीवनसत्त्व बी १२ हे मज्जासंस्थेच्या कार्यासाठी उपयुक्त आहेत..Milk Processing : दूध प्रक्रिया उद्योगातून सावरले कुटुंब.दुधातील विविध घटक त्याच्या स्वाद, पोषण, टिकवण क्षमता आणि प्रक्रिया सुलभता यावर प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, म्हशीच्या दुधातील अधिक स्निग्ध पदार्थामुळे त्यातून तयार केलेले पदार्थ अधिक गोड, चवदार होतात, तर गाईच्या दुधातील कमी स्निग्ध पदार्थामुळे हलके व सहज पचणारे असतात. दुधाच्या रासायनिक गुणधर्मांमुळेच दुग्ध प्रक्रिया उद्योगात विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी दुधाचा प्रकार व त्यातील रासायनिक घटक जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते, जेणेकरून उत्पादनाची गुणवत्ता, पोषणमूल्य आणि टिकाऊपणा सुनिश्चित करता येईल..दूध संकलन प्रक्रियादूध प्रक्रिया उद्योगातील सर्वांत महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे दूध संकलन. ही प्रक्रिया मुख्यत्वे सहकारी संस्था, खासगी कंपन्या तसेच लघू उद्योगांच्या माध्यमातून केली जाते. केंद्रांवर दुधाचे वजन मोजले जाते, त्याचे तापमान तपासले जाते, तसेच त्यामधील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण आणि दुधातील द्रव्य घटक यांची कसून तपासणी केली जाते. दुधाची गुणवत्ता तपासल्यानंतरच ते पुढील प्रक्रियेसाठी थंड साठवण यंत्रांमध्ये पाठवले जाते. त्यामुळे दूध ताजे राहते आणि खराब होण्यापासून वाचते. संकलनाच्या दरम्यान दूध दूषित होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जाते. संकलन केंद्रावर शुद्धता आणि स्वच्छतेवर जास्त लक्ष दिले जाते..Milk Processing : गणित, ताळेबंद पक्का केल्यानेच ‘चिंतामणी’ ब्रॅण्डची वृद्धी.दुधाची चाचणीदुधाची चाचणी व विश्लेषण दुग्ध उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या चाचण्यांमुळे दूध शुद्ध आहे की नाही, त्यात कोणतेही विषारी किंवा हानिकारक घटक आहेत का, पोषणमुल्ये टिकलेली आहेत की नाही हे निश्चित करता येते.सर्वप्रथम, स्निग्ध पदार्थ व स्निग्धता नसलेले घटक (एसएनएफ) चाचणी केली जाते. यामध्ये दुधातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण आणि सॉलिड नॉट फॅट घटक मोजले जातात. स्निग्ध पदार्थ आणि एसएनएफ हे दुधाच्या पोषणमूल्यांचे प्रमुख घटक आहेत.स्निग्ध पदार्थ जास्त असलेल्या दुधाचा उपयोग तूप, पनीर आणि दही तयार करण्यासाठी होतो, तर कमी स्निग्ध पदार्थ असलेले दूध लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी अधिक उपयुक्त ठरते..जिवाणू तपासणी चाचणीस निळ्या रंगाची क्षय चाचणी (MBRT) म्हणतात. या चाचणीमध्ये दुधात जिवाणूंची संख्या किती आहे हे तपासले जाते. दुधामध्ये जिवाणूंची संख्या जास्त असल्यास ते पटकन खराब होऊ शकते आणि त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. या चाचणीमुळे दुधाची स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित करता येते.दुधाची आम्लता चाचणी देखील केली जाते. या चाचणीमध्ये दूध ताजे आहे की नाही हे कळते. दुधामध्ये आम्लता वाढल्यास ते खराब झाले असे समजतात. ताजे दूध कमी आम्लतेचे असते, तर खराब झालेल्या दुधात आम्लतेचे प्रमाण जास्त असते..Milk Processing Industry : दूध प्रक्रिया उद्योगातून अर्थकारण केले बळकट.तपासणीमध्ये दुधाचा घनता तपासली जाते, ज्यामुळे दुधात पाणी घातले आहे की नाही हे समजते. या चाचणीसाठी लॅक्टोमीटर या यंत्राचा वापर केला जातो. दुधाची नैसर्गिक घनता कमी असल्यास त्यात पाणी मिसळले गेले असल्याचा संशय येतो.दुधातील औषधांचे अवशेष तपासणी केली जाते. काही वेळा जनावरांना दिलेल्या औषधांचे अवशेष दुधामध्ये राहू शकतात, जे मानवाच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. या चाचणीमुळे दुधात कोणतेही अशुद्ध पदार्थ नसल्याची खात्री केली जाते.दुधाच्या सर्व चाचण्या नियमितपणे, योग्य पद्धतीने आणि वेळेवर करून दुधाची शुद्धता, गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा निकष राखणे फार आवश्यक आहे..दुधाच्या चाचणीचे परिणाम.दुधाचा प्रकार, घटक आणि वैशिष्ट्ये.- डॉ. अनुप्रिता जोशी, ९६३७२४०४०६ (अन्नप्रक्रिया महाविद्यालय, परभणी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.