Milk Quality Inspection: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्यात प्रशासकीय यंत्रणेत शिस्तीवर भर देत भेसळीविरोधात धडक कारवाई सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाने दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादकांवर छापेमारी करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. या मोहिमेमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळबाजांचे धाबे दणाणले आहेत..गेल्या चार महिन्यांत सांगली जिल्ह्यातील संशयित दूध संकलन केंद्रे, डेअरी आणि दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल ५२ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान दुधाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीचे अहवाल आता समोर येऊ लागले आहेत..Milk Adulteration Case: दूध भेसळप्रकरणी कारवाईला विलंब झाल्यास आंदोलन.प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, चार ठिकाणांच्या दुधाचे नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून कमी फॅटचे अथवा पाणी मिसळलेले दूध विकून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, एका ठिकाणचा दुधाचा नमुना मानवी आरोग्यासाठी ‘असुरक्षित’ असल्याचे आढळले आहे. या नमुन्यात आरोग्यास अपायकारक रसायने अथवा डिटर्जंट, युरियासारख्या घटकांची भेसळ असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने घेतलेल्या नमुन्यांपैकी तब्बल ४२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून प्रलंबित आहेत. हे अहवाल आल्यानंतर कारवाईची व्याप्ती आणि गुन्ह्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. .Milk Adulteration Controversy: दूध भेसळीवर आवाज न उठवल्याबद्दल वळसे पाटील यांनी राजीनामा द्यावा : निकम.केवळ दूधच नव्हे, तर खवा, पनीर, चक्का, तूप आणि बटर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीचीही प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्ह्यातील तब्बल ६८ उत्पादन केंद्रे व विक्री केंद्रांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत दोन ठिकाणचे पदार्थ निकृष्ट दर्जाचे आढळले. तसेच एका नमुन्याला प्रयोगशाळेने ‘असुरक्षित’ ठरविले असून, तो नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे..जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही घटकाला पाठीशी घातले जाणार नाही. भेसळयुक्त दूध अथवा अन्नपदार्थ विकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम आणखी व्यापक करण्यात येणार आहे. नागरिकांनीही संशयास्पद प्रकारांची माहिती व तक्रारी प्रशासनाकडे द्याव्यात.- नीलेश मसारे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.