अमोल साळेPoor Financial Management: माजी हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन माईक टायसनची कहाणी म्हणजे कर्जबाजारीपणा आणि खराब आर्थिक व्यवस्थापनामुळे होणाऱ्या आर्थिक पडझडीचे एक (कु)प्रसिद्ध उदाहरण आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मोठा होत तो इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध आणि यशस्वी बॉक्सर बनला. .तो १९८० च्या दशकात त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. प्रत्येक लढतीत लाखो डॉलर्स कमवत होता. त्याच्या कारकिर्दीत त्याची एकूण कमाई सुमारे ४०० दशलक्ष डॉलर्स असल्याचा अंदाज आहे. तथापि, इतकी प्रचंड कमाई असूनही, टायसनच्या उधळपट्टी करण्याच्या सवयी तितक्याच वाईट होत्या. त्याने अनेक आलिशान घरे आणि कार खरेदी केल्या. त्या सगळ्या घरांच्या देखभालीसाठी त्याने मोठा लवाजमा ठेवला होता..त्याच्याकडे बंगाली वाघांसह अनेक विदेशी पाळीव प्राणी पाळलेले होते. त्याने आपल्या पत्नीसाठी वीस लक्ष डॉलरचा बाथटब आणि खूप सारे दागिने घेतले होते. त्याने असंख्य लक्झरी कार खरेदी केल्या. एक दिवस वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी त्याला अडवले तर त्याने पोलिसांना त्याच्या बेंटले कारची चावीच देऊन टाकली. ‘‘ही कार माझ्यासाठी अपशकुनी आहे, तुम्हीच ठेवून घ्या या कारला,'''' असे तो म्हणाला..Loan Repayment Notice: मृत शेतकऱ्याच्या नावे कर्ज परतफेडीची नोटीस.माईक टायसनने स्वप्नातही पहिले नव्हते इतके पैसे त्याने खूप कमी वयात कमावले. पण असे म्हणतात अपयशापेक्षा यश पचविणे अधिक अवघड असते. त्याला १९९२ ते १९९५ या कालावधीत अनेक कायदेशीर समस्यांना आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याच्या संकटांमध्ये इतकी भर पडली, की त्याला तुरुंगवास भोगावा लागला. त्याने २००३ मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला..त्या वेळी, त्याच्यावर दोन कोटी तीस लाख डॉलर्सचे कर्ज जमा झाले होते. त्याची उधळपट्टी ही फक्त त्याच्या प्रचंड मोठ्या कमाईच्या जोरावर नव्हती. तर इतकी कमाई असून देखील त्याने मोठ-मोठे कर्ज उचलले होते. आपली कमाई अशीच कायम राहील आणि आपण कधीही हे कर्ज फेडू शकू, असा अवास्तव आत्मविश्वास कदाचित त्याच्या या उधळपट्टीमागे असावा..Farmer Loan : शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी करण्याचा वेगळा मार्ग.माईक टायसनची कथा हे बेफाम उधळपट्टी आणि आर्थिक व्यवस्थापनाचा अभाव यामुळे प्रचंड मोठी संपत्तीसुद्धा कशी संपुष्टात येऊ शकते याचे उदाहरण आहे. अगदी अशाच प्रकारची कथा आपल्याला आपल्या आजूबाजूला प्रत्येक आर्थिक वर्गात बघायला मिळते. आपली उत्पन्न पातळी कितीही मोठी असली, तरी आर्थिक साक्षरता आणि जबाबदारीने खर्च करणे नेहमी महत्त्वाचे असते. टायसनची महानता या गोष्टीत आहे की इतके मोठे खचवणारे आर्थिक अपयश येऊन सुद्धा त्याने पुन्हा उभारी घेतली. आर्थिक नियोजन शिकून घेतले, मिळेल ते काम केले, आपले कर्ज फेडले आणि आपल्या या अनुभवावर जगासमोर खुल्या मनाने तो बोलला..कर्ज म्हणजे आपण न कमावलेल्या पैशांना खर्च करण्याची मुभा. कर्ज काढणे म्हणजे आपल्यासमोर असलेले पर्याय कमी करून टाकणे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तीसमोर मर्यादित पर्याय असतात. आणि या मर्यादित पर्यायांमुळे त्याच्या प्रगतीला सुद्धा मर्यादा येतात. कर्ज हे सुद्धा एक वित्तीय उत्पादन (फायनान्शियल प्रॉडक्ट) आहे. ते विकणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या प्रॉडक्टची अधिक विक्री करण्यात रस असतो. याचा अर्थ असा होत नाही की आपले उत्पन्न एखाद्या कर्जासाठी लायक बनले की लगेच आपण ते कर्ज उचलले पाहिजे..कर्ज आपल्याला मिंधे बनवते. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तीला इतरांना नाराज करून चालत नाही. आजच्या काळात मानवाला ज्या महत्त्वाच्या चिंता आहेत, त्यात आर्थिक चिंता अग्रस्थानी असतात आणि त्यातही कर्जाचे हप्ते थकतील की काय याच्या चिंता सगळ्यात जास्त असतात. कर्ज ही निवड असते. आपल्यासमोर असलेले पर्याय वाढवायचे की संपवायचे हे कर्जाच्या आकड्यावर ठरते.७०८३५८१२८१(लेखक आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.